शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट पवनानदीत

By admin | Updated: May 13, 2017 04:36 IST

मामुर्डी, किवळे, सांगवडे व गहुंजे परिसरात पवना नदीत जलपर्णीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र नदीपात्रात कपडे व गोधड्या

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : मामुर्डी, किवळे, सांगवडे व गहुंजे परिसरात पवना नदीत जलपर्णीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र नदीपात्रात कपडे व गोधड्या धुण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गहुंजे, मामुर्डी व किवळेतील स्मशानभूमीत अंत्यविधींनंतर निर्माण होणारी रक्षा थेट नदीत टाकली जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील देहूरोड बाजारपेठ, आंबेडकरनगर, गांधीनगर, राजीव गांधीनगर, शितळानगर नं. एक व दोन, विकासनगर रस्त्यालगत संकल्पनगरी परिसरातील गृहसंकुले, मामुर्डी तसेच थॉमस कॉलनी भागातील सांडपाण्यावर कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाकडून कोणतीही प्रक्रिया केली जात नसून सांडपाणी थेट नदीत जात आहे. या सांडपाण्यामुळे किवळे गावठाण व सांगवडेकडे जाणाऱ्या रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गहुंजे गावठाण येथे पवनेवरून देहूरोड लष्करीतळासाठी लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) या संस्थेमार्फत पाणी उचलून विविध भागात पुरवठा करण्यात येतो. गहुंजेतील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व मैदानासाठी गहुंजेतच पाणी योजना राबविली असून येथून पाणी उचलले जाते. किवळेनजीक मामुर्डी हद्दीत पवनेवरून देहूरोड कॅन्टोन्मेन्टची सोळा एमएलडी क्षमतेची स्वतंत्र पाणीयोजना राबविली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वीस लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी रावेत येथून पाणी उचलले जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पाणी पिंपरी- चिंचवड परिसरातील उद्योगांसाठी दररोज उचलत आहे. हवेलीतील पूर्वेकडील वाघोली परिसरातील विविध गावांसाठी राबविलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठीही रावेत येथूनच पाणी उचलले जाते. गहुंजे ते रावेत दरम्यान शेती, पिण्यासाठी, लष्कर व औद्योगिक वापरासाठी पवनेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पवन मावळा व हवेलीच्या किवळे -रावेत भागात पवना नदीबद्दल प्रत्येकाला आत्मियता वाटते. गहुंजे व सांगवडे भागात लोकसंख्या कमी असल्याने प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. उत्सवकाळात मूर्ती व निर्माल्य थेट नदीत टाकण्यात येते. गहुंजे, मामुर्डी व किवळे येथील स्मशानभूमीतील रक्षा थेट नदीत टाकण्यात येते. सांगवडे येथील शेतकरी मारुती आमले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव गोपाळ व किसन आमले यांनी रक्षा विसर्जन पाण्यात न करता स्मशानभूमी परिसरात मोठा खड्डा घेऊन त्याठिकाणी वृक्षरोपण करून प्रदूषण न करण्याबाबतच संदेश दिला होता. अशा विविध उपक्रमांना नदीकाठच्या गावांत शासनस्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे. पवना प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात किवळे-विकासनगर व मामुर्डी परिसरात सुरुवात होते. या भागातील विविध ओढे व नाल्यांतून देहूरोड बाजारपेठ, आंबेडकरनगर, गांधीनगर, राजीव गांधीनगर, शितळानगर नं. एक व दोन, विकासनगर रस्त्यालगत संकल्पनगरी परिसरातील गृहसंकुले, मामुर्डी तसेच थॉमस कॉलनी भागातील सांडपाणी वाहत नदीपात्रात जाते. किवळे गावठाण व सांगवडे रस्त्यालगत सांडपाण्याला दुर्गंधी येते. काही ठिकाणी मोठा फेस दिसून येतो. कॅन्टोन्मेन्ट हद्दीतून नदीत येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. देहूरोडच्या सांडपाण्यामुळे किवळे गावठाण व सांगवडेकडे जाणाऱ्या रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. महापालिका किवळे, मामुर्डी या भागात कायमस्वरूपी निर्माल्य कुंड्यांची व्यवस्था करीत नसल्याने बहुतांशी रहिवाशी निर्माल्य थेट नदीत टाकतात. मामुर्डी, किवळे भागात नदीपात्रात वाहन, कपडे व गोधड्या धुणे मोठ्या प्रमाणात होत आहे.