शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीला घेरलेय समस्यांनी

By admin | Updated: November 2, 2015 00:43 IST

सांडपाण्याची जलवाहिनी फुटल्यामुळे इमारतीच्या प्रत्येक घरामधील छताची गळती, सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा

सचिन देव,  पिंपरीसांडपाण्याची जलवाहिनी फुटल्यामुळे इमारतीच्या प्रत्येक घरामधील छताची गळती, सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा, धोकादायक वीज मीटर बॉक्स, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, संरक्षक भिंतीचे अर्धवट काम आदी समस्यांनी कृष्णानगर पोलीस वसाहतीमधील रहिवासी त्रस्त झाले असल्याचे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून आढळून आले.पिंपरी - चिंचवड शहरामध्ये सेवेसाठी बाहेरील जिल्ह्यांमधून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चिखली येथील कृष्णानगर येथे पोलीस वसाहतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे चार मजल्यांच्या अकरा इमारती असून, त्यात १७६ घरे आहेत. या ठिकाणी काही कर्मचारी १५ वर्षांपासून, तर काही ५ ते ७ वर्षांपासून राहत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने त्यांची दुरुस्ती व देखभाल या विभागाकडून वेळेवर होणे गरजेचे आहे. वांरवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना धोका पत्करून राहावे लागत आहे.पोलीस वसाहतीमधील चार व सहा नंबरच्या इमारतींमधील सांडपाण्याच्या वाहिनींना तडे जाऊन त्या फुटल्यामुळे त्याच्या पाइपातून घाण पाण्याची गळती सुरू आहे. बहुतांश मजल्यांवरील शौचालये व बाथरूममधील छत घाण पाण्याने गळत आहेत. यामुळे शौचालयेही खराब झाली आहेत. चार नंबर इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जिन्याजवळ तर इमारतीमधील पाणी झिरपून पाण्याची डबकी साचलेली दिसून आली. नागरिकांना इमारतीमध्ये जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. सहा नंबर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छताची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. सर्व ठिकाणी सांडपाण्याच्या वाहिन्या जुनाट झाल्यामुळे त्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात घाण पाण्याची गळती होत आहे. आठ नंबर इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सांडपाण्याच्या तुटलेल्या वाहिनीचे घाण पाणी जात असल्यामुळे त्या टाकीतून गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशी सात नंबरच्या इमारतीमधून पिण्यासाठी पाणी घेऊन जावे लागत आहे. या इमारतीमधून त्या इमारतीत पाणी नेण्यासाठी महिलांना श्रम करावे लागत आहेत. शेवटच्या मजल्यावरील रहिवाशांना इलेक्ट्रिक मोटारीनेहीे पाणी वर चढत नाही. मात्र, दैनंदिन वापरासाठी पाण्याची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव तेच पाणी वापरावे लागत आहे.