शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोपखेलला होणार पाँटॉन पूल

By admin | Updated: May 31, 2016 02:02 IST

बोपखेल येथील मुळा नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता तरंगता पूल ७ जूनला काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली.

पिंपरी : बोपखेल येथील मुळा नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता तरंगता पूल ७ जूनला काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. त्यानुसार सध्या असलेल्या पुलाच्या शेजारीच ‘पाँटॉन पूल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हा पूल तयार होईपर्यंत सध्या असलेला पूल काढण्यात येऊ नये, अशी मागणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) हद्दीतून जाणारा रस्ता वापरासाठी गेल्या वर्षी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर लष्कर आणि स्थानिक प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेत मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लष्कराने मुळा नदीवर हा पूल उभारून बोपखेल ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून दिला आहे. परंतु, पावसाळ्यात हा पूल धोकादायक ठरणार असल्यामुळे लष्कराने ७ जूनपूर्वी तो काढण्याचा निर्णय घेतला आहे.त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर शकुंतला धराडे, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक संजय काटे, लष्कर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, लष्कर पूल ७ जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हटविणार आहेत. सीएमईतून जाणारा पूर्वीचा रस्ता खुला करण्यास नकार दिला. कुंभमेळ्यात गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पाँटॉन पुलाप्रमाणे पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)