शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वैर इथलं संपत नाही!

By admin | Updated: February 23, 2017 02:48 IST

सत्तेच्या राजकारणासाठी सख्या भावा-भावांमध्ये अनेक ठिकाणी फूट पडली आहे

रावेत : सत्तेच्या राजकारणासाठी सख्या भावा-भावांमध्ये अनेक ठिकाणी फूट पडली आहे. त्याचाच प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत पाहावयास मिळाला. मात्र, विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुध्द तुकाराम भोंडवे (काँग्रेस) हे दोन सख्खे भाऊ २००७च्या महापालिका निवडणुकीपासून सातत्याने एकमेकांच्या विरोधात उभे असतात. २०१२ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले मोरेश्वर भोंडवे यांनी या वर्षीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली. पक्षाचे सर्वेसर्र्वा शरद पवार आणि पिंपरी-चिंचवडचा रिमोट स्वत:कडे ठेवणारे अजित पवार यांच्याबरोबर राहून पक्षाचे पाठबळ मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यांचे बंधू माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. २००७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत तुकाराम भोंडवे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष म्हणून उभे असलेल्या सख्ख्या भावाचा म्हणजेच मोरेश्वर यांचा पराभव केला होता. २०१२ च्या निवडणुकीत मात्र हे चित्र एकदम उलटे झाले. काँग्रेसने तुकाराम भोंडवे यांना रिंगणात उतरवले. त्यांच्याविरुद्ध मोरेश्वर अपक्ष म्हणून उभे राहून विजयी झाले. (वार्ताहर)या निवडणुकीत परत दोघे भाऊ एकमेकांसमोर उभे राहिले. फरक एवढाच आहे सातत्याने अपक्ष म्हणून उभे राहणारे मोरेश्वर या वेळी मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावरून आपले भविष्य आजमावत आहेत. पालिकेची यंदाची निवडणूक अनेकार्थीं वेगळी ठरत आहे. पक्षातील भांडणे, बंडखोरी, निवडणुकीसाठी होणारा खर्च यावरून रंगत वाढली असतानाच अनेकजण सहकुटुंब, सहपरिवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भोंडवे बंधूंमधील कोणाला मतदार राजा कोणाला स्वीकारतो, हे निकालानंतरच कळेल.