शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकी उघडी; मध्यरात्रीच्या आत दुकाने बंद

By admin | Updated: November 3, 2015 03:33 IST

बीट मार्शलची वाहने पोलीस चौकीसमोर, पोलीस चौकीलाही टाळे याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ

पिंपरी : बीट मार्शलची वाहने पोलीस चौकीसमोर, पोलीस चौकीलाही टाळे याबाबतची वस्तुस्थिती लोकमतने निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळे सौदागर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी, तसेच वाकड, हिंजवडीच्या पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुधारणा घडून आल्याचे दिसून आले. रात्री ११ वाजताच टाळे लागणारी पोलीस चौकी रात्रभर खुली राहू लागली. तसेच मध्यरात्रीपर्यंत खुल्या राहणाऱ्या टपऱ्या, हॉटेलांना बारा वाजताच टाळे लागले.पिंपळे सौदागर आणि वाकड, हिंजवडी परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि टपऱ्या सुरू ठेवल्या जात असल्याचे वास्तव लोकमत टीमने केलेल्या पाहणीत आढळून आले. रात्री तरुण, तरुणींचे घोळके ठिकठिकाणी चहा, नाष्ट्याच्या टपऱ्यांवर, हॉटेलवर दिसून येतात. शहराच्या अन्य भागात पोलीस पानटपरीसुद्धा रात्री बारानंतर सुरू ठेवू देत नाहीत. पिंपळे सौदागर आणि वाकड, हिंजवडी मात्र त्यास अपवाद असल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस यंत्रणा सजग करण्यात आली. पिंपळे सौदागर भागात पोलीस चौकीसमोर बीट मार्शलची वाहने उभी करून इतरत्र गायब झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी समज दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केलेली खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत त्यांना तंबी दिली असल्याने रविवारी रात्री बीट मार्शलच्या फेऱ्या दिसून आल्या. लोकमत बातमीच्या प्रभावाने एका दिवसात पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी भागाचे चित्र पालटले आहे. (प्रतिनिधी)