शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेच्या बदलीला विरोध

By admin | Updated: July 2, 2017 02:55 IST

पुणे महानगरपालिकेचे परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : पुणे महानगरपालिकेचे परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची चर्चा सध्या पालिकेसह पुणे शहरात जोरात सुरू आहे. मात्र एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राजकीय लोक पाठिंबा देत नसले तरी सामाजिक संस्थांचा मात्र मुंढे यांना पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ कात्रज चौकात शिवशंभू प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना रस्त्यावर उतरली आहे. त्यांची बदली करू नये, या मागणीसाठी या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कात्रज चौकात निदर्शने केली. ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरळीत करण्यासाठी आम्हाला तुकाराम मुंढे पुण्यात हवे आहेत : मी एक पुणेकर’ अशा आशयाचे मजकूर असलेले फलक शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या वेळी हातात घेतले होते. कात्रज येथील पीएमपी स्थानकासमोर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली किरण खामकर, राजू कदम, अक्षय दीक्षित, ज्ञानेश्वर गांगुर्डे, अतिश नाईकनवरे, अक्षय जाधव, महादेव येरवग्गे, अजय चिंचाणे, अमर कडू, राज भोसले, रोहन भिंताडे, स्वप्निल मकाशे, बंटी भोसले, शुभम भोईटे, सागर घाडगे यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.पीएमपी सध्या आर्थिक डबघाईस आली आहे. ती नफ्यात आणण्यासाठी दिवसरात्र प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे आहेत. त्यासाठी अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. राजकीय जोडे बाजूला सारून आज सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे मत या वेळी कदम यांनी व्यक्त केले.