शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन !

By admin | Updated: July 5, 2016 18:10 IST

पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता टप्प्याटप्याने राज्यातील इतर जिल्हयांमधील वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन योजना सुरू करण्याच्या दिशेने शासनाने पावली उचलली आहेत.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५ : पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता टप्प्याटप्याने राज्यातील इतर जिल्हयांमधील वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन योजना सुरू करण्याच्या दिशेने शासनाने पावली उचलली आहेत. येत्या महिन्याभरात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा चार जिल्ह्यांमधील सुमारे पाच हजार कलावंतांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होणार आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, धुळे, मुंबई उपनगर,पालमपूर अशा आठ जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना आॅनलाइन पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे.

संचालनालयाकडून जिल्हा परिषदेला पेन्शनसाठी निधी देण्यात येत असे, तो पंचायत समितीमार्फत वृद्ध कलावंतांना दिला जात असे, पण ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असल्याने पेन्शन आॅनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी बँक आॅफ महाराष्ट्रच्या सहकार्याने काम सुरू असून, ते ८० टक्के पूर्ण झाले आहे.एका महिन्यात काम पूर्ण करून पेन्शन आॅनलाइन पद्धतीने द्यायला सुरुवात होईल,अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालक अमिता तळेकर यांनी दिली.

राज्य शासन राज्यातील २१ हजार ज्येष्ठ कलावंतांना दर चार महिन्यांनीपेन्शन देते. ए, बी, सी या श्रेणीत राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय या पद्धतीने ह्यअह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना २,१५० रुपये, ह्णबह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना १८००, तर ह्यकह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना १५०० रुपये प्रति महिना पेन्शन चार महिन्यांतून दिली जाते. वृद्ध कलाकारांना जिल्हापरिषद व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पेन्शन पूर्वी दिली जायची. त्यासाठी कलावंतांना जिल्हा परिषद व बँकेत जावे लागायचे.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने आॅनलाइन पेन्शन योजना सुरू झाली. मात्र खाते क्रमांक व माहितीची पडताळणी करताना अडचणी येत असल्याने कलावंतांना आठ-आठ महिने या पेन्शनपासून वंचित राहावे लागतहोते. यातील अडथळे काही प्रमाणात दूर करण्यात यश आले असून पुणे जिल्ह्यापाठोपाठ सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यात आॅनलाइन पेन्शन योजना सुरू होणार आहे.----------महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक संचालनालातर्फे वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र समित्या यासाठी काम पाहत आहेत.----------------राज्यात पेन्शनधारक वृद्ध कलावंत-२१ हजार 

पुण्यातील पेन्शनधारक वृद्ध कलावंत-११५०

सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यातील कलावंत- ५०००