शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे मंत्रालयात खेटे

By admin | Updated: June 3, 2016 00:37 IST

आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीनंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, सहायक आयुक्तांनाही बदलीचे वेध लागले असून, इच्छितस्थळी बदली व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात

पिंपरी : आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीनंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, सहायक आयुक्तांनाही बदलीचे वेध लागले असून, इच्छितस्थळी बदली व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहर अभियंता पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा रंगली आहे. राज्यभरात बदल्यांचे सत्र सुरू आहे. आयुक्त राजीव जाधव यांची बदली होऊन त्यांच्या जागी दिनेश वाघमारे रुजू झालेले आहेत. शहर अभियंत्यांकडे स्थापत्य, बांधकाम परवाना, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा पदभार होता. या कामांचेही विभाजन केले आहे. काही अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. रवींद्र दुधेकर यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या सह शहर अभियंता पदाचा भार सोपविण्यात आला आहे. तसेच बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात समन्वय अधिकारी म्हणून सह शहर अभियंता अयुबखान पठाण यांची नियुक्ती केली आहे. तसेच क प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रमुख दत्तात्रय फुंदे यांचा पदभार सहायक आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सोपविला आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार गावडेंकडे होता. तो ड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे सोपविला आहे. तर फ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला आहे. या अधिकाऱ्यांनी ३ जूनपासून बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)