शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीतून अहिंसेचा संदेश

By admin | Updated: April 10, 2017 02:25 IST

अहिंसा रॅली, रक्तदान शिबिर, नेत्रदान जागृती,शालेय साहित्यवाटप अशा विविध कार्यक्रमांतून अहिंसेचा संदेश

चिंचवड : अहिंसा रॅली, रक्तदान शिबिर, नेत्रदान जागृती,शालेय साहित्यवाटप अशा विविध कार्यक्रमांतून अहिंसेचा संदेश देत पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या माध्यमातून श्री भगवान महावीर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सप्ताह शहरातील जैन बांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. सामाजिक कार्यात अग्रेसर होत जैन महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले. निगडीमधील श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.नेत्रदान जनजागृती व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे विजय भिलवडे व प्रकाश शेडबाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.पिंपरी-चिंचवड जैन सोशल ग्रुपच्या वतीने चिंचवडमधील चैतन्य हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रुपच्या सभासदांच्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सहायक पोलीस उपायुक्त वैशाली जाधव,पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे,विवेक मुगळीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जैन सोशल ग्रुपचे राजेंद्र चोरडिया, मोनिका गांधी, संतोष खिंवसरा यांच्यासह सर्व ग्रुपच्या सदस्यांनी योगदान दिले.श्री पार्श्वनाथ दिगंबर ट्रस्ट, पारस भवन यांच्या वतीने चिंचवडमधील गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना, तसेच पन्नालाल लुंकड वसतिगृह येथे मिठाई व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी देवेंद्र बाकलीवाल व विजय बाडजात्या यांनी योगदान दिले.दुपारी चारला सांगवी येथील भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ह्यजीवो और जीने दोह्ण असा संदेश देत अनेक जैन बांधव रॅलीत सहभागी झाले होते.भगवान महावीरांचा जयघोष करीत रॅलीत अनेक युवक,युवती व महिला हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते.ट्रस्टचे रामेशलालजी ओसवाल यांच्या हस्ते ध्वज फडकवीत रॅली ला सुरुवात झाली. दापोडी, कासारवाडी,पिंपरी,चिंचवड,आकुर्डी,प्राधिकरणमार्गे निगडीतील जैन मंदिरात रॅलीची सांगता करण्यात आली. जैन महासंघाचे डॉ. अशोक पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, सतीश खाबिया, वीरेंद्र जैन, सूर्यकांत मुथियान, सुरेश गादिया, नेनसुख मांडोत, संजय जैन, सुभाष सुराणा, विलास पगारिया, दिलीप भन्साळी, नितीन बेदमुथा, प्रकाश भंडारी, रमेश ओसवाल, अनुप नहार, राजेंद्र तातडिया, अशोक पगारिया यांनी महोत्सवासाठी योगदान दिले.प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात अहिंसा पुरस्कार व भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)अहिंसा पुरस्कार व भक्ति संध्या कार्यक्रमचिंचवड स्टेशन येथील श्री शांतीनाथ जैन मंदिर व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी स्टेशन परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. बँड, बाजाच्या गजरात जयघोष करीत अनेक जैन बांधव यात सहभागी झाले होते. संघाच्या वतीने नाटीकाचे आयोजन करण्यात आले.मंदीर ट्रस्ट च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या वेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३०जणांनी रक्तदान केले. ट्रस्टचे जितेंद्र जैन,रमेश सोनिगरा, विनोद दोशी, प्रकाश सोनिगरा यांनी योगदान दिले. स्थानक संघाचे शितल गादिया,उज्वला लुंकड,कांचन बोरा,आनंद पगारिया,सुरेश गादिया,संपत खिवंसरा,अशोक बाफना,जयप्रकाश राका कांतीलाल खिवंसरा यांनी योगदान दिले.जय महावीर, जय महावीरचा जयघोषजय महावीर, जय महावीर असा जयघोष करीत चिंचवडगावातील जैन बांधवांनी रविवारी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश आचरण करण्याची गरज असल्याचे फलक हातात घेऊन अनेक जैन बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. श्री श्वेतांबर टेम्पल ट्रस्ट व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडगावातील भगवान महावीर स्वामी मंदिरातून मिरवणुकीला सुरवात झाली.चापेकर चौक,गांधीपेठ,चिंचवड गावठाण परिसरातून पुन्हा मंदिरापर्यंत आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी नागरिक उपस्थित होते.अनेक ठिकाणी शीतपेय, प्रसादाचे वाटप करीत होते.