शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये उफाळला नवा-जुना वाद

By admin | Updated: January 25, 2017 02:02 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील जुन्या-नव्याचा वाद उफाळून आहे. कार्यकर्त्यांची

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील जुन्या-नव्याचा वाद उफाळून आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांची बैठक झाली.निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन करण्यात आले. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितल्याने कार्यकर्ते शांत झाले. उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र, शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युतीची केवळ चर्चा सुरू आहे. जागांवर चर्चा अडकली आहे. तर दुसरीकडे युतीबाबत भारतीय जनता पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. काही जण युती आवश्यक असल्याचे सांगतात, तर काही जण युती केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे शहरातील पक्षाचे स्थान पाहून युतीचा निर्णय घ्यावा, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे यांच्याच समर्थकांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. त्या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एका बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर ही बाब पालकमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यांनी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या दरम्यान सोमाटणे फाटा येथे जुन्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. (प्रतिनिधी)