पिंपळे गुरव : येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने हिंद सेनेचे सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती अनेक संकल्पांद्वारे साजरी करण्यात आली. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पिंपळे गुरव येथील शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण कसे देता येईल हा संकल्प झाला. दत्तात्रय कदम यांनी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारानुसार तरुण-तरूणी यांनी देशप्रेम काय असते हे शिकण्यासाठी नेताजींच्या कार्याचा आढावा घ्यावा. अरुण पवार म्हणाले, ‘‘नेताजी यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रत्येक घरातून एक स्वातंत्र्यसैनिक व बल मागितले. सैन्य तयार केले. प्रत्येकाच्या हातात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बंदूक दिली . तरी आपण सर्व मिळून या गरीब मुलांच्या हातात पेन पुस्तक देऊन निरक्षरता मिटवू आणि हा संकल्प सुरू करणार आहे. (वार्ताहर)
नेताजींना आदरांजली
By admin | Updated: January 26, 2017 00:11 IST