शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही मूल्यांच्या जागृतीची गरज

By admin | Updated: November 16, 2015 01:47 IST

गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे.

पिंपरी : गेल्या वर्षभरात पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जास्तच चर्चा घडविली जात आहे. त्यातून नेहरू आणि काँग्रेसविषयी द्वेष पसरविण्याचा आणि इतिहास बदलून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला परतवून लावण्याची व नेहरू, गांधींच्या लोकशाही मूल्ल्यांची माहिती समाजात देऊन जागृती निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी चिंचवड येथे केले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने चिंचवड चापेकर चौकातील पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात महाजन बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, चिंतामणी सोंडकर, मयूर जैसवाल, संकेत जगताप, हरी नायर, बाबासाहेब बनसोडे, एनएसयूआय सरचिटणीस विशाल कसबे, वर्षा झपके, बिंदू तिवारी, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, जनार्दन पोलकडे, रियाज शेख, वीरेंद्र गायकवाड, आबा खराडे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, ‘‘नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतली, तेव्हा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था निर्माण करणे, हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान होते. नेहरू संसदेत नेहमी हजेरी लावत. संसदेविषयी लोकांमध्ये आदर व सन्मान निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन होते. सहिष्णुतेचे मूल्य बाळगणाऱ्या नेहरूंनी आपल्या भिन्न विचारांच्या विरोधकांविषयीदेखील कधीही कटुता बाळगली नाही. राम मनोहर लोहिया व नेहरू प्रथमत: एकत्र होते. परंतु, नंतर लोहिया विरोधात गेले. तरीही नेहरूंनी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. न्याय्य मार्गाने, न्यायपूर्व धर्म मार्गाने, धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करणे, हे महात्मा गांधीचे स्वप्न नेहरूंनी सत्यात आणले.’’ (प्रतिनिधी)