शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 02:41 IST

लोणावळा शहरालगतच्या नाणे मावळातील कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गट व पंचायत

लोणावळा : लोणावळा शहरालगतच्या नाणे मावळातील कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या कुसगाव व वाकसई गणातील तिन्ही जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. मावळ पंचायत समितीचा वाकसई गण हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे महादू हरी उघडे, भाजपाचे संदीप उंबरे व शिवसेनेचे बाबू शेळके यांच्यात ही लढत झाली. मागील पंचवार्षिक काळात ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने ती टिकविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. या जागेवर विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपाने जोर लावला होता. अखेर राष्ट्रवादीच्या उघडे यांनी ४५६३ मते मिळवत शिवसेनेचे शेळके यांचा ७१० मतांनी पराभव केला. शेळके यांना ३८५३, तर भाजपाचे संदीप उंबरे यांना ३५७४ मते मिळाली.कुसगाव गणात देखील मागील पंचवार्षिक काळात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार हरीश कोकरे विजयी झाले होते. हा गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होता. राष्ट्रवादीच्या राजश्री संतोष राऊत यांनी ३५२६ मते मिळवत प्रतिस्पर्धी भाजपाच्या संगीता अनंता गाडे यांचा ७१४ मतांनी पराभव केला. गाडे यांना २८१२ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उषा संजय घोंगे यांना तिसऱ्या क्रमांकाची २८०५ व नवबहुजन समाज परिवर्तन पार्टीच्या रचना सुरेश घोमोड यांना १७४ मते मिळाली.कुसगाव वाकसई गट दहा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथील जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र येथेसुद्धा सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीने बाजी मारत शिवसेनेच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे यांचा १२२४ मतांनी पराभव करत राष्ट्रवादीच्या कुसुम ज्ञानेश्वर काशिकर यांनी विजय मिळविला. काशिकर यांच्या रूपाने वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये प्रथम जिल्हा परिषदेचे सदस्यत्व मिळाले. काशिकर यांना प्रथम क्रमांकाची ८००३ मते मिळाली, तर गाडे यांना ६७७९ मते मिळाली. भाजपाच्या अनिता दिलीप कडू यांना ६४२० मते मिळाली. राष्ट्रवादीने या गट व गणात तिन्ही जागा जिंकत बाजी मारल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांची रॅली मतदारसंघात काढण्यात आली होती. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दीपक हुलावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमोल केदारी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, नाणे मावळचे कार्याध्यक्ष राजू देवकर आदी त्यात सहभागी झाले होते. (वार्ताहर)