शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

टँकरलॉबीचा महापालिकेला ठेंगा

By admin | Updated: July 19, 2014 03:21 IST

टँकरचे पाणी हद्दीबाहेर जाऊ नये म्हणून टँकरला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसविण्यासाठी महापालिकेने केलेल्या सक्तीला शहरातील टँकरमालकांनी विरोध केला आहे.

पुणे : एकीकडे पुणेकरांना दिवसाआड पाणी मिळत असताना, टँकरचे पाणी हद्दीबाहेर जाऊ नये म्हणून टँकरला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसविण्यासाठी महापालिकेने केलेल्या सक्तीला शहरातील टँकरमालकांनी विरोध केला आहे. अवघ्या आठ हजार रुपयांची ही यंत्रणा आपल्याला परवडत नसल्याचे सांगून या टँकरमालकांनी सोमवारपासून टँकरचा पाणीपुरवठा बेमुदत बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आधीच पाणीकपातीने हैराण झालेल्या पुणेकरांच्या मनस्तापात भरच पडणार आहे. पाणीकपातीमुळे शहरात रोज ५५० टँकरच्या फेऱ्या होतात. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याने तळ गाठल्याने महापालिकेतर्फे शहरात गेल्या आठवडाभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही पाणीकपात करतानाच, महापालिकेने शहरातील बांधकामे बंद करण्याबरोबरच जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजना करतानाच शहरातील पिण्यासाठीचे पाणी बांधकामे तसेच हद्दीबाहेर विकले जाऊ नये म्हणून टँकरला जीपीएस बसविण्याचा निर्णयही पालिकेने घेतला. तसेच, २१ जुलैपर्यंत ही यंत्रणा बसविण्यास टँकरमालकांना मुदत देण्यात आली. मात्र, ही यंत्रणा महागडी असल्याचे आणि आधी महापालिकेने आपल्या टँकरना जीपीएस बसवावी व मग आम्हाला सक्ती करावी, अशी मागणी टँकरमालकांच्या प्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभागाकडे केली. तसेच, महापालिकेने सक्ती केल्यास येत्या सोमवारपासून शहरातील टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी बंद करण्याचा इशारा पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत टँकरमालकांनी दिला आहे.(प्रतिनिधी)