शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 3, 2017 02:14 IST

यंदा पाऊस वेळेवर पडणार असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी कामशेत सह नाणे मावळ, अंदर मावळ व आजूबाजूंच्या

लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : यंदा पाऊस वेळेवर पडणार असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी कामशेत सह नाणे मावळ, अंदर मावळ व आजूबाजूंच्या शेती क्षेत्र असलेल्या भागात अजूनही मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी न लावल्याने भात पेरण्या रखडल्या आहेत.मावळात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. पण, पाऊस काही केल्या बरसत नसल्याने अनेकांची भातपेरणी तसेच शेतीची इतर कामे थांबली आहेत. त्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने लगेच भातपेरणी करावी का नको, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मावळ तालुका हा भाताचे आगार असून बहुतेक शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. या भात पिकाची लागवड करण्यासाठी आधी भात रोपवाटिका तयार कराव्या लागतात. प्रामुख्याने मे महिन्याच्या शेवटी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर या भात रोपवाटिकासाठी पेरणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पाण्यालगत आहेत. ते भातपेरणी उरकून पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच भातलावणी सुरू करतात. इतर शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहावे लागत असून त्यानुसार नियोजन करावे लागत आहे.अनेक तज्ज्ञ व जाणकार शेतकरी जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भात पेरणी केल्यास जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भात रोपे लागवडीसाठी तयार होतात, असा सल्ला देत आहेत.डोंगरालगत अथवा पाण्यापासून दूर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ढगाळ वातावरण व मॉन्सूनपूर्व पाऊस पडत नसल्याने चिंता वाढू लागल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाच्या आधी पेरणी केली तर बियाणे पिठाळून जाईल, दुबार पेरणीचे संकट येईल, जास्त पाऊस झाला तर पेरणी करता येणार नाही. तसेच भात रोपवाटिका जगवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. यात मोठा खर्च होतो, आदी समस्यांमुळे शेतकरी हैराण असून अनेक एकमेकांचा सल्ला घेऊन चर्चा करताना दिसत आहेत.