शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मेंगडेवाडीत आगीत घर भस्मसात

By admin | Updated: April 24, 2017 04:50 IST

मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अमोल रामदास मेंगडे यांच्या शेतातील घराला शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास

लोणी-धामणी : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अमोल रामदास मेंगडे यांच्या शेतातील घराला शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागून सर्व घर बेचिराख झाले. या आगीत एक शेळी आणि तिचे करडू ठार झाले. मेंगडेवाडीच्या पश्चिमेला अमोल रामदास मेंगडे यांचे शेतात घर आहे. या घरात त्यांचा भाऊ तुषार मेंगडे पत्नी वर्षा मेंगडे व छोटी मुलगी संस्कृती मेंगडे (वय ३ वर्षे) राहतात. त्यांच्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. जोराचा वारा वाहत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. लोकांनी आरडाओरडा केल्याने वर्षा मेंगडे या त्यांची मुलगी संस्कृती हिला घेऊन त्वरित बाहेर पडल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गोठ्यातील गाय सोडविण्यास ग्रामस्थांना यश आले. मात्र शेळी व तिचे करडू आगीमुळे सोडवता न आल्याने त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत रोख १५ हजार रुपये, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या कानातील कुड्या, शिलाई मशिन, १ पोते बाजरी, १ पोते तसेच इतर घरगुती साहित्य असे एकूण २ लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. येथील ग्रामस्थ नेरंद्र मेंगडे, विनायक आरगडे, संदीप मेंगडे, साहेबराव मेंगडे, कुशाभाऊ मांडगे व ग्रामस्थांनी ३ विहिरींवरील ३ मोटारी चालू करून ३ तासांत आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)