शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांकाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: July 3, 2017 02:46 IST

पुणे जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्काचा निधी पीएमआरडीएला दिल्यावर जिल्ह्यातील विकासकामांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्काचा निधी पीएमआरडीएला दिल्यावर जिल्ह्यातील विकासकामांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या हक्काचा मुद्रांक शुल्क निधी पीएमआरडीएला देण्यात येऊ नये, अशी मागणी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. पीएमआरडीएकडे पायाभूत सुविधा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यामुळे नागपूर सुधारणा न्यासच्या धर्तीवर राज्य शासनाकडूनपुणे जिल्हा परिषदेला दिला जाणाऱ्या एक टक्के मुद्रांक शुल्कापैकी अर्धी रक्कम पीएमआरडीएला द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पीएमआरडीएच्या या मागणीला जिल्हा परिषदेच्या हक्काचा मुद्रांक शुल्काचा निधी देण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.जिल्हा परिषदेचे सर्व पक्षाचे गटनेते आणि पदाधिकाऱ्यांना निधी देण्यासाठी विरोध केला आहे. पीएमआरडीएने जिल्हा परिषदेऐवजी राज्य शासनाकडून निधी घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील विविध पक्षांचे गटनेते आणि पदाधिकारी यांनीदेखील केली आहे.जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडून एक टक्के मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला दिले जाते. पीएमआरडीच्या हद्दीमध्ये जिल्ह्यातील ११ शहरे आणि आठशे गावांचा समावेश आहे. या गावामध्ये पायाभूत सुविधा करण्याची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे.मुद्रांक शुल्कची थकबाकी त्वरित द्यावीमुद्रांक शुल्काचा निधी कमी झाल्यास जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर परिणाम होणार आहे. यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनावर परिणाम होणार आहे. मुद्रांक शुल्कचा निधी कमी झाल्यास, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणार आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून जिल्हा परिषदेला १८९ कोटी ५७ लाख ७५ हजार रुपये येणे बाकी आहे. शासनाने मुद्रांक शुल्कची थकबाकी त्वरित द्यावी, तसेच जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्क निधी कोणत्याही परिस्थितीमध्ये पीएमआरडीएला देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री फडवणीस यांना भेटून करणार असल्याचे विश्वास देवकाते यांनी सांगितले.