शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठा, प्रेमाशिवाय भक्ती व्यर्थ

By admin | Updated: March 5, 2016 00:34 IST

निरपेक्ष भक्ती म्हणजे भोळी भक्ती. संत तुकोबारायांनी भोळी भक्ती केली. निर्विकार भक्ती केली. त्यांच्या भक्तीत अहंकार नव्हता. प्रेमाने परमात्म्याची भक्ती केली

किवळे : निरपेक्ष भक्ती म्हणजे भोळी भक्ती. संत तुकोबारायांनी भोळी भक्ती केली. निर्विकार भक्ती केली. त्यांच्या भक्तीत अहंकार नव्हता. प्रेमाने परमात्म्याची भक्ती केली. निष्ठेशिवाय व प्रेमाशिवाय केलेली भक्ती व्यर्थ आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप नानामहाराज तावरे यांनी केले. महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरिनाम सप्ताह समिती व घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी यांच्या विद्यमाने श्रीक्षेत्र घोरवडेश्वर पायथा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवा करताना तावरेमहाराज बोलत होते. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार, भिवाजी राक्षे, हभप महादेव भसे, हभप सुदाम येवले, हभप निर्गुण बोडके, पोपट भेगडे, खंडू राक्षे, तसेच पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. कीर्तनाला गायनसाथ हभप नितीनमहाराज काकडे, हभप गणेशमहाराज मोहिते, हभप रामेश्वरमहाराज, हभप राजाराम मुऱ्हे, हभप संजय बोडके यांनी केली. मृदंगसाथ हभप मयूर बोडके, मयूर घोडेकर व स्वप्निल सूर्यवंशी यांनी केली. तावरेमहाराजांचा सन्मान वारकरी महामंडळाचे संपर्कप्रमुख हभप जालिंदरमहाराज काळोखे यांच्या हस्ते करण्यात आला. शांताराम भोते यांनी सूत्रसंचालन केले. पहाटे चार ते सहा काकडारती, त्यानंतर सकाळी गाथा पारायण झाले. रावेत जय गणेश भजनी मंडळ व विकासनगर येथील त्रिमूर्ती महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री नऊला कीर्तनसेवा झाली. कीर्तनानंतर शिवशंभो एकतारी भजनी मंडळाने हरिजागर केला. या वेळी परिसरातील बहुसंख्य भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.(वार्ताहर)