शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’चा दिव्याखाली अंधार

By admin | Updated: June 4, 2016 00:23 IST

वाहन परवाना काढताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहतुकीच्या सर्व नियमांची उजळणी संबंधितांकडून करवून घेतली जाते

पिंपरी : वाहन परवाना काढताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहतुकीच्या सर्व नियमांची उजळणी संबंधितांकडून करवून घेतली जाते. नियमपालन, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची कशी काळजी घ्यावी याबाबत चाचणी घेतली जाते. मात्र, परवान्यासाठी सर्व चालकांची परीक्षा घेणारे आरटीओच नियम धाब्यावर बसवीत आहे. संबंधितांना या कार्यालयात जाण्यासाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे आरटीओच्या दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती आहे. रस्त्यावरच दुचाकी-चारचाकी वाहने उभी करून थाटलेली दलालांची दुकाने, झेरॉक्स, पानटपऱ्या, थंड पेयांची दुकाने या सर्वांनी आरटीओला विळखा घातला आहे. आरटीओ त्यामध्ये हरवले आहे. ते शोधण्याची वेळ कार्यालयात पहिल्यांदाच येणाऱ्यांवर येते. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना येथे नाइलाजास्तव दलालांचे शिकार व्हावे लागत आहे. चिखली येथे आरटीओची इमारत आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर भाडेतत्त्वावर आरटीओ आहे. इमारतीपासून २०० फूट अंतरावरच दलालांची दुकाने सुरू होतात. पूर्णानगरला जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चौकातच काही दलालांनी टपऱ्या टाकल्या आहेत. याच्या बाजूला उसाचे गुऱ्हाळ, चहा-नाष्ट्याच्या हातगाड्या, थंडपेय विक्रेते यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण केले आहे. या टपऱ्या कायमस्वरूपी अवस्थेत आहेत. टपऱ्यांच्या पुढे काही दलाल दुचाकीवर सुटकेस घेऊन दुकानदारी करतात. त्यांच्याकडे आलेले ग्राहक त्यांच्या दुचाकीसमोरच वाहने उभी करतात. इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड’ अशा नावाची कमान आहे. त्या कमानीबाहेरही अनेक दुचाकी जागा मिळेल तशा उभ्या केल्या जातात. पुढच्या बाजूला रस्त्यावरच अनेकांनी पाकीट, की-चेन, चहा अशी दुकाने थाटली आहेत. काही बहाद्दरांनी झेरॉक्स मशिन वाहनातच बसवून त्याला दुकानाचे स्वरूप दिले आहे. चहा-नाष्ट्याच्या गाड्याही याच पद्धतीत उभ्या असतात. या दुकानदारांच्या गाड्यांसमोर आरटीओत आलेल्या व्यक्तीने वाहन उभे केल्यास त्यांच्यात वाद निर्माण होतात. रस्त्यावर अतिक्रमण केलेले हे दुकानदार नागरिकांशी असे भांडतात, जसे काही त्यांनी ती जागाच खरेदी केली आहे. या अतिक्रमणामुळे आरटीओत प्रवेश करणे अवघड झाले आहे. (प्रतिनिधी)