शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कामगार सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: January 25, 2017 01:58 IST

ना मूलभूत सुविधांची पूर्तता, ना भविष्याची सुरक्षितता, ना आयुष्याची शाश्वती अशा चक्रव्यूहात शहरातील सव्वालाख कामगारवर्ग

भोसरी : ना मूलभूत सुविधांची पूर्तता, ना भविष्याची सुरक्षितता, ना आयुष्याची शाश्वती अशा चक्रव्यूहात शहरातील सव्वालाख कामगारवर्ग दोन वेळच्या अन्नासाठी धडपडत आहे. संघटित कामगारांना संघटनांचा पाठिंबा वेळोवेळी मिळतो व ते आपल्या सुरक्षेचे प्रश्न भक्कमपणे मांडू शकतात पण असंघटित कामगाराला वाली कोण, त्यांच्या अपघाती मृत्यूला कोण जबाबदार, कारखान्यांमध्ये सुरक्षा साधनांच्या पुरवठ्याबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती यंत्रणा कारणीभूत, असे अनेक प्रश्न कामगार सुरक्षेबाबत निरुत्तरित आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा मुख्य कणा असलेला कामगार वगार्ची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. टाटा मोटर्स, बजाज आॅटो, मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स, एसकेएफ, अ‍ॅटलास कॅप्को, थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया, सॅण्डविक एशिया, अल्फा लाव्हल आदी लहान-मोठे सहा हजार उद्योग पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरात आहेत. या कंपन्यांत लाखो कामगार उदरनिर्वाह करतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करीत असताना यंत्रसामग्री व्यवस्थित व सुरक्षेच्या सूचना वाचून त्याचा वापर कसा करावा, याविषयी प्रशिक्षण दिले जाते. पण लघुउद्योग व छोट्या वर्कशॉपज्ञध्ये चालणा-या कामांमध्ये कामगारवगार्चं सुरक्षेसाठी योग्य साधने पुरवली जात नसल्याने अशा कंपन्यांमध्ये अपघात होतात. बऱ्याचशा कंपनी योग्य प्रशिक्षण व सुरक्षा साधने पुरवतात; पण यंत्रसामग्रीच्या चुकीच्या हाताळणीमुळे अनेक अपघात होताना यापूर्वीच्या काही घटनांमधून दिसून आले आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी क्षेत्रात हाताची बोटे तुटणे, पाय तुटणे, डोक्याला गंभीर इजा याविषयी होण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या कामगारांना ईएसआय योजना लागू आहे. त्याच्यासाठी ईएसआय दवाखाने असून, औषध उपचार सोय आहे. इएसआय योजनाही व्यवस्थित राबवली जात नसल्याने ब-याचशा कामगारांना इएसआय सुविधा असूनही त्याचा योग्य लाभ मिळत नाही. यामुळे अपघात होऊ नये यासाठी सुरक्षित उपकरणे हाताळणे हे एकमेव उपाय आहे. कामगारांना कंपनीकडून सर्व सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा होणे गरजेचे असून त्याचा योग्य वापरही होणे गरजेचे आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये रासायनिक, ज्वालाग्राही,रबर, प्लॅस्टिक, अवजड स्वरूपाच्या अनेक कंपन्यात अनेक कामगार कुठल्याही सुरक्षिततेच्या साधनांशिवाय काम करतात. या कामगारांना मास्क, हेल्मेट, गमबुट, गॉगल, हातमोजे, सेफ्टीबेल्ट, सुरक्षा पोशाख अशी सुरक्षेसंबंधातील साधने पुरवणे बंधनकारक आहे. परंतु अनेक कामगार या साधनांशिवाय काम करताना दिसून येतात. त्यामुळेच जीवघेणे अपघात होऊन कामगारांचा जीव जाऊ शकतो.(वार्ताहर)