शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

रॉकेलचा भडका, महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 06:14 IST

स्वयंपाक करीत असताना रॉकेलच्या डब्याला धक्का लागून झालेल्या भडक्यामुळे भाजून अश्विनी मिलिंद बचुटे (वय २०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेहरुनगर : स्वयंपाक करीत असताना रॉकेलच्या डब्याला धक्का लागून झालेल्या भडक्यामुळे भाजून अश्विनी मिलिंद बचुटे (वय २०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणारा भाऊ विशाल शशेराव जावळे (वय २०), बहीण स्वाती ऋषी गंजाले (वय २६) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना नेहरुनगर येथील विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटीमध्ये रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामधील प्रज्ञा विकास सोसायटी या इमारत क्रमांक ४ मध्ये दुसऱ्या मजल्यावरील २०५ या सदनिकेत शशेराव किसनराव जावळे हे कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वीच दोन्ही मुली स्वाती गंजाले व अश्विनी बचुटे या त्यांच्याकडे आल्या होत्या.रविवारी सकाळी जावळे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तर घरामध्ये त्यांचा मुलगा विशाल, अश्विनी, स्वाती हे तिघे बहीण-भाऊ घरामध्ये होते. अश्विनी सकाळी १०च्या सुमारास स्वयंपाक करत असताना शेजारीच असलेल्या रॉकेलच्या डब्याला धक्का लागल्याने त्यातील सर्व रॉकेल खाली सांडले. भडका उडाला. या घटनेत अश्विनी या ७० टक्के भाजल्या तर तिला वाचविताना विशाल व स्वाती हे जखमी झाले. स्वयंपाकखोलीत झालेल्या स्फोटामध्ये घरामधील फ्रिज, पंखा व इतर साहित्य जळाले. मोठा आवाज आल्यानंतर शेजारील रहिवाशांनी जावळे यांच्या घरामध्ये धाव घेतली त्यावेळी धूर येत होता.(वार्ताहर)

तो चिमुकला वाचला४या घटनेवेळी हॉलमध्ये झोळीमध्ये स्वाती यांचा दोन वर्षांचा मुलगा झोपलेला होता. घटना घडल्यानंतर नागरिकांनी घरामध्ये प्रवेश करून झोळीमध्ये झोपलेल्या चिमुकल्याला तातडीने बाहेर काढले. त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. याचबरोबर अश्विनी यांचा ४ वर्षांचा मुलगा व स्वाती यांचा ३ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असल्यामुळे तेदेखील सुदैवाने बचावले.

इमारतीमधील अग्निशामक यंत्रणा कुचकामी४विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रत्येक इमारतींमध्ये सुरक्षेसाठी अग्निशामक दलाची यंत्रणा बसविली आहे. परंतु ती कुचकामी असून, घटना घडलेल्या प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटीमधील अग्निशामक यंत्रणा व्यवस्थित नाही. वाहिनी खराब झाला असल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या वेळी पाहणीत लक्षात आले.