शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

उमेदवारांची वाढली घालमेल

By admin | Updated: February 23, 2017 03:07 IST

महापालिका निवडणुकीचे मतदान झाले. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, क्रॉस व्होटिंग

पिंपरी : महापालिका निवडणुकीचे मतदान झाले. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, क्रॉस व्होटिंग झाल्याने कोणाला फटका बसणार, पॅनल टू पॅनल किती उमेदवार निवडून येतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज मतमोजणीवेळी मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. निवडणूक लढण्यासाठी सर्व काही पणाला लावले. मतदार काय कौल देणार, याबद्दल मनात शंका-कुशंका निर्माण होऊ लागल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होताच, निवडणुकीचे वातावरण तापू लागले. त्यानंतर प्रचार सुरू झाला. प्रचाराची रणधुमाळी दोन दिवसांपूर्वी संपली. पाठोपाठ मतदानही झाले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२४ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाचे १२६, शिवसेनेचे ११९, काँग्रेसचे ५९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३७, एमआयएमचे १४, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे १०, समाजवादी पार्टीचे ४, बहुजन समाज पार्टीचे १८, भारीप बहुजन महासंघाचे ६, बहुजन मुक्ती पार्टीचे ६, जनता दल सेक्युलरने १, भारतीय शेतकरी कामगार पक्षचा १, आरपीआय आठवले गटाचे ६,रिपब्लिकन सेनेचा १, भारतीय नवजवान सेनेचा १, सीपीआय (एम)चे ३, रासचा १ आणि अपक्ष २३६ असे एकूण ७७४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ईव्हीएम यंत्रावर मतदारांनी नोंदविलेल्या मतानुसार त्यांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. (प्रतिनिधी)८९ विद्यमान रिंगणात४महापालिका निवडणुकीत दोन स्वीकृत सदस्यांसह ८९ विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादीचे ४७, भाजपाच्या तिकिटावर १९, शिवसेनेकडून ११, कॉँग्रेसकडून २, मनसेकडून एक, तर ९ अपक्षांचा समावेश आहे. माजी महापौर आर. एस. कुमार हे सातव्यांदा, योगेश बहल व भाऊसाहेब भोईर हे सहाव्यांदा, मंगला कदम व वसंत लोंढे हे पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांपैकी किती जणांना पुन्हा संधी मिळेल.