शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील फलाटाची लांबी वाढविणार

By admin | Updated: March 4, 2016 00:22 IST

लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटांची लांबी वाढविणे, लोणावळ्यात प्रादेशिक रेल्वे संग्रहालय, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर

पिंपरी : लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटांची लांबी वाढविणे, लोणावळ्यात प्रादेशिक रेल्वे संग्रहालय, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारणे यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. लोकमतने आता बास उपक्रमांतर्गत पुणे-लोणावळा लोहमार्गाचे प्रश्न मांडले होते. याबाबत पुढकार घेऊन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरा केला. तिसऱ्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासह मावळातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लागले आहेत. याविषयी माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, ‘‘रेल्वे अर्थसंकल्पात अनेक कामांना मंजुरी मिळाली. मुंबई-पुणे या महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणाऱ्या पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी केलेल्या मागणीला गतवर्षी मंजुरी मिळाली. त्यासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. पुणे- नाशिक २६५ कि.मी. लांबीचा अनेक वर्षे प्रतीक्षेतील मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे- नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची दोन शहरे जोडली जाणार असून, हा मार्ग मावळातील भेगडेवाडी स्थानकापासून नव्या रेल्वेमार्गांद्वारे चाकणला जोडून नाशिकपर्यंत जात असून, याचा फायदा पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील उद्योगवाढीस होणार आहे. वाहतूक सुविधेच्या अंतर्गत लोणावळा रेल्वे स्थानकावर २४/२८ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी फलाटाची लांबी वाढविण्याकरिता मंजुरी मिळाली आहे. कामशेत व नाणे मावळ यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील ४३ नंबर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यासाठी तरतूद केली आहे. गेल्या वर्षभरात लोकलमधून पडून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. याबाबत मागणी केली होती.’’ (प्रतिनिधी)