शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मिळकतकर बुडवे पालिकेच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:18 IST

स्वयंघोषणा पत्र देण्यास नागरिकांना १५ दिवसांची मुदत, मिळकती शोधण्यासाठी पथके नियुक्त

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील नोंदणी न केलेल्या आणि वाढीव अधिकृत व अनधिकृत बांधकामांचे, मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार असून, येत्या १५ दिवसांत स्वयंघोषणापत्र देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पंधरा दिवसांनंतर नोंदणी नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. टॅक्स बुडविणाऱ्यांचा शोध घेणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी असताना त्यांनी नोंदणी न झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ८० हजार नवीन मिळकती सापडल्या होत्या. त्यानंतर काही वर्षांत मिळकतींचे सर्वेक्षण झाले नाही. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीपट्टी आणि मिळकतकरवाढ करू नये, या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.करवाढ करण्याऐवजी नोंद न झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करावे, नोंदणी करावी, त्यातून मिळकतकर विभागाचे उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी आज माध्यमांना करवाढीविषयीची भूमिका विशद केली.आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘टप्प्याटप्प्याने करवाढ करावी, अशी प्रशासनाची सूचना असते. करवाढ प्रस्तावित असली, तरी याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभा घेईल. मिळकतींचे सर्वेक्षण २०१२ मध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये नोंदणी नसलेल्या मिळकती सापडल्या होत्या. त्यांची नोंदणी करून मिळकत करप्रणालीत त्यांना आणले आहे. त्याच धर्तीवर महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कर बुडविणाºयांचा शोध घेणार आहे. मिळकत बांधली, परंतु पूर्णपणे नोंद केली नाही.तसेच अर्धवट नोंदणी केली. अशा अधिकृत आणि अनधिकृत दोन्ही प्रकारांतील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच निवासी बांधकाम; परंतु त्याचा वापर व्यावसायिक केला जात असेल, अशाही मिळकती शोधणार आहे. नागरिकांना स्वयंघोषणापत्रासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार असून, त्यानंतर महापालिकेच्या पथकांच्या वतीने शोध घेतला जाणार आहे.’’शिक्षक वर्गीकरणाचा प्रस्ताव लटकणारपिंपरी : जिल्हा परिषद शाळांमधील १३१ शिक्षक महापालिकेच्या शाळांमध्ये वर्गीकरणाचा प्रस्ताव लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका सेवा नियमात अशी सेवा वर्गीकरणाची तरतूदच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या प्रस्तावाची तपासणी सुरू आहे, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली.शिक्षण समिती व महासभेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील १३१ शिक्षकांची सेवा महापालिका शाळांमध्ये वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या दोन्ही सभांमध्ये प्रस्ताव मंजूर करताना विरोधकांनी याला तीव्र विरोध केला होता. या वर्गीकरणासाठी प्रत्येक शिक्षकाकडून आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रशासनाकडून या प्रस्तावाची तपासणी केली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. शिक्षकांची सेवा वर्गीकरणाचा विषय राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.’’मिळकतकर न भरणाºयांना नोटीस दिली आहे. तसेच कारवाईच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. मिळकतकर वसुली पथकांना हवे ते मनुष्यबळ दिले जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर थकबाकी असणारी आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत वकिलांच्या पॅनलशी चर्चा केली आहे. दावे निकाली काढून करवसुली वाढविण्यावर भर राहणार आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिं.चिं. मनपा

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका