शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:51 IST

मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे.

कामशेत : मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे. पण त्यादृष्टीने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या लोहगड किल्ल्यावर जाणाºया रस्त्याची गेल्या काही वर्षांमध्ये चांगली सुधारणा झाली असून, इतर अनेक सोईंमुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. एरव्ही एकटा असणाºया या गडावर इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, गड किल्ल्यांचेसंवर्धन करणाºया विविध संस्थांचे सभासद येत असत. पण मागीलकाही वर्षांमध्ये वर्षविहारासाठी लोणावळा खंडाळ्यात दाखल होणाºया पर्यटकांना हा किल्ला खुणावू लागल्याने येथे शनिवार, रविवार व इतर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे.किल्ल्याच्या पायथ्याला विविध दुकाने थाटली गेली असून, खाद्य पदार्थांच्या गाड्या व इतर वस्तूच्या दुकानदारीमुळे स्थानिकांना मोठा रोजगार निर्माण झाला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने या किल्ल्यावर पाच गडपालकांची नेमणूक करण्यात आली आहे.मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. दिवसभरात गडावर किती पर्यटक आले व त्यानंतर किती पर्यटक माघारी गेले, याची कोणत्याही प्रकारची नोंद येथे नसल्याने एखादा पर्यटक अनावधानाने रस्ता चुकून अथवा अपघात होऊन हरवला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.गडावर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ बनवणे व विक्री करणे सुरू असून, गडावर गणेश दरवाजाच्या पुढील दरवाजाच्या दिवटीमध्ये हा व्यवसाय गडपाल यांच्या मर्जीने सुरू आहे. येथे वडापाव, चहा व इतर पदार्थ विकले जात आहेत.काही पर्यटक नागरिकांशीही हुल्लडबाजी करतात. भरधाववाहने चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने हुल्लडबाजांची स्टंटबाजी वाढत चालली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, त्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनाला जाग येणे गरजेचे आहे.