शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीवासीयांच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: October 30, 2015 00:21 IST

कामगार, कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील झोपडीवासीयांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने न पाहिल्याने आणि

पिंपरी : कामगार, कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील झोपडीवासीयांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने न पाहिल्याने आणि प्रकल्पांचे नियोजन बारगळल्याने अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत. ‘सत्ता द्या, आपणास अच्छे दिन देऊ’ असे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने झोपडीवासीयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. निम्म्याहून अधिक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झालेले नाही.पिंपरी-चिंचवड परिसरात घोषित ३७ आणि अघोषित ३४ अशा ७१ झोपडपट्ट्या आहेत. शहरातील झोपड्यांचे पुनर्वसन करून झोपडीमुक्त शहर करण्याचे धोरण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने अवलंबिले होते. मात्र, राज्यात आणि महापालिकेत सत्ता असताना हे स्वप्न पूर्ण झालेले नाही. रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास गती कधी मिळणार हा प्रश्न झोपडीवासीय करीत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष अशा प्रमुख पक्षांच्या प्रचारपत्रकांमध्ये झोपडीपट्टी पुनर्वसनास गती देऊ, झोपड्यांचे पुनर्वसन करू, राज्य शासनाकडून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले गेले होते. मात्र, त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. आघाडीच्या काळात रखडलेले प्रकल्प युतीच्या काळातही जैसे-थे आहेत.केंद्राच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत चिखली येथे शहरी गरिबांसाठी उभारल्या जाणाऱ्या दीड लाख रुपयांत घरकुल देण्याचा दुसरा टप्पा रखडला आहे. केंद्र, राज्य व महापालिकेकडून वेळेवर निधी मिळूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडला. त्यापैकी केवळ ६ हजार ७५० लोकांचीच लॉटरी पद्धतीने नावे काढली आहेत. झोपडीधारकांची मते मिळविण्यासाठी सत्ता आल्यास घरकुलाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राजकीय पक्षांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण झालेले नाही.(प्रतिनिधी)