शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मावळात हायटेक प्रचार

By admin | Updated: February 13, 2017 01:54 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे तिकीट वाटप झाल्यानंतर मावळात प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी

वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे तिकीट वाटप झाल्यानंतर मावळात प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी व्हॉट्स अ‍ॅप, क्लिप, व्हॉट्स अ‍ॅप संदेश, चित्रफिती यांचा वापर करत आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. निवडणुकीच्या काळात त्याचा वापर करण्यात उमेदवारही यात मागे नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने मतदारांच्या घरोघरी जाण्यासोबतच सोशल मीडियाचाही मावळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरात वापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. उमेदवारांनी तर गट आणि गणनिहाय व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपसुद्धा तयार केले आहेत. यात प्रत्येक पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पदयात्रा, जाहीर सभा, छोट्या सभा असे एक ना अनेक उपाय करावे लागतात. या निवडणुकीतही उमेदवार त्याचा वापर करीत आहेतच. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधणे अधिक सोपे झाले आहे. उमेदवारांनी आपापल्या गट आणि गणानुसार व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर जास्तीत जास्त नागरिकांना जोडले जात आहे. सकाळी निघालेल्या पदयात्रांचे फोटो तत्पर या ग्रुपवर सेंड करून ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत. नागरिकांशी प्रत्यक्ष घरी जाऊन संवाद साधणे सुरूच आहे. परंतु जी मंडळी कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्यापर्यंत सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येकाच्याच मोबाइलवर अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नावाने नवनवीन ग्रुप असल्याचे दिसत आहे. आपण या ग्रुपमध्ये कसे काय जोडले गेलो हे नागरिकांनादेखील कळेनासे झाले आहे. उमेदवारांचा हा डिजिटल प्रचार फंडा सध्या शहरात व ग्रामीण भागात चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.प्रचारपत्रके आणि कार्य अहवाल यांच्या वाटपाबरोबरच उमेदवारांकडून डिजिटल प्रचारालाही पसंती दिली जात आहे. निवडणुकीला आठ-नऊ दिवसांचा अवधी राहिल्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप क्लिप, व्हॉट्स अ‍ॅप संदेश, चित्रफिती आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, या सेवा पुरवणाऱ्यांच्या व्यवसायामध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल प्रचार साहित्याच्या मागणीमध्ये ग्रामीण भागातील उमेदवाराकडून देखील वाढ झाली आहे.(वार्ताहर)