शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहांची परवानगी महापौर, स्थायीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:59 IST

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर महासभेसाठी करण्यात येणार आहे़ हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर महासभेसाठी करण्यात येणार आहे़ हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मधुकर पवळे सभागृहाचा वापर इतर विभागांच्या कार्यक्रमासाठी करायचा झाल्यास स्थायी समिती सभापतींची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे, असे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महासभा होते. याशिवाय महापालिकेतील निवृत्त होणारे कर्मचारी, खेळाडू, कलाकार तसेच इतर क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कर्मचाºयांचे सत्कार व समारंभ महापौरांच्या हस्ते केले जातात. मात्र, यापुढे महासभेशिवाय नगरसेवकांच्या बैठकीसाठी किंवा महापालिकेच्या इतर विभागाकडील महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी हे सभागृह उपलब्ध करून देण्याकरिता महापौरांची परवानगी आवश्यक असणार आहे. परवानगी प्राप्त झालेल्या पत्राची प्रत अशा विशिष्ट कार्यक्रमापूर्वी सुरक्षा विभागाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.खासगी कार्यक्रमाकरिता इतर व्यक्ती अथवा संस्थांना सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार नाही. पवळे सभागृहाचा वापर प्रामुख्याने स्थायी समिती सभा, विशेष समिती सभा, विशेष समित्या, प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुका, विभागप्रमुखांची बैठक, कर्मचारी निवृत्तीचा कार्यक्रम आदींकरिता करता येईल. नगरसचिव विभागाची कार्यक्रम पत्रिका सुरक्षा विभागास देणे आवश्यक राहील.