शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक इच्छुकांना मार्गदर्शन

By admin | Updated: January 25, 2017 02:04 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७चे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र आॅनलाइन भरण्यासाठी राजकीय

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७चे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र आॅनलाइन भरण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अर्ज सादर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील संत तुकारामनगर आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. या कार्यशाळेत सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरी सुविधा केंद्र चालक, सायबर कॅफेचे मालक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, स्टॅम्प व्हेंडर, महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महापालिकेचे सर्व कॉम्प्युटर आॅपरेटर व नागरिक उपस्थित होते.या वेळी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडील सुधीर बोराडे यांनी नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र भरणेकामी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संगणकाद्वारे सादरीकरण, तसेच दृक्श्राव्य माध्यमाद्वारे माहिती दिली. तसेच आॅनलाइन निवडणूक अर्ज भरण्याबाबतचे प्रात्यक्षिकही सादर केले. नागरिकांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. (प्रतिनिधी)