शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुली बाजीगर

By admin | Updated: June 18, 2014 02:16 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पिंपरी-चिंचवड विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पिंपरी-चिंचवड विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. हवेली, मुळशी, मावळमधील ५८ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मावळचा निकाल ९६.८९ टक्के, मुळशीचा निकाल ९५ टक्के, हवेलीचा निकाल ९६.१६ टक्के लागला आहे. सोमवारी दुपारी एकला मंडळाकडून इंटरनेटवर निकाल जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची शहरातील सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. निकाल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये दिसत होती. परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर एका क्लिकवर निकाल मिळत होता. सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी व गुणपत्रिकेची प्रिंट काढण्यासाठी गर्दी दिसून आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. अनुत्तीर्णांचे चेहरे हिरमुसलेले दिसत होते. उत्तीर्ण झालेल्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. निकाल जाहीर होताच एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.पिंपरी-चिंचवड विभागातील महापालिका व खासगी अशा १५४ शाळांमधून १५ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १५ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १५ हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहराचा एकूण निकाल ९६.७२ टक्के लागला. गतवर्षी ८९.६० टक्के निकाल होता. त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)