शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: July 15, 2017 01:35 IST

जिरेगाव परिसरातील वनविभागामध्ये अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : जिरेगाव परिसरातील वनविभागामध्ये अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा खून एका महिलेवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयावरून झाला. आरोपी संदीप देठे याला आपल्या पत्नीवर मृत शिवशंकर याचा डोळा असल्याचा संशय होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप नारायण देठे (वय ३२, रा. कुसखुर्द, ता. जि. सातारा), संतोष विष्णू शिरटावले (वय २१, मूळ रा. खडगाव , ता. जि. सातारा, सध्या रा. विरार (मुंबई), श्रीकांत आबा शिरटावले (वय २६, रा. खडगाव, ता. जि. सातारा, सध्या रा. कांदिवली ईस्ट मुंबई), ऋषभ ऊर्फ सोनू लक्ष्मण यादव (वय २१, रा. बनगर, ता. जि. सातारा, सध्या रा. खेतवाडी, मुंबई) यांना अटक केली. ६ जून रोजी जिरेगावच्या वनविभागात एक अज्ञात व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी दौंड आणि कुरकुंभ पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केल्यानंतर तपासाची चक्रे साताऱ्याकडे फिरली. यामधील मृत शिवशंकर ऊर्फ शिबू (मूळ रा. कोलकता) व मुख्य आरोपी संदीप देठे या दोघांची पूर्वीच ओळख होती. त्यामुळे संदीप आणि मृत शिवशंकर सातारा येथे काही काळ संदीप यांच्या गोठ्यामध्ये कामाला होता. त्यानंतर मृत शिवशंकर आणि संदीप यांच्यामध्ये वैयक्तिक वादामुळे शिवशंकर कुरकुंभ येथे पेंटिंगचे कामे करू लागला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीप देठे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात होता. संदीपला त्याचा मित्र ऋषभ याने माहिती दिली. यावर संदीपला राग आला आणि त्याने शिवशंकरचा खून करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्याने ऋषभला शिवशंकरला दारू पाजण्यास सांगितले व अन्य मित्रांसोबत तो कुरकुंभ परिसरात आला. त्यानंतर वरील आरोपीनी शिवशंकरचा गळा चिरून खून केला व जिरेगावच्या वनविभागात त्याचा मृतदेह लपविला. वरील चारही आरोपींना बुधवारपर्यंत (दि. १९) पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर अधिक तपास करीत आहेत. असा लागला खुनाचा तपासखून झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर तपास न लागल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी फ्लेक्स, पॉम्पलेट कुरकुंभसह अन्य लावले, तसेच कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार पुरविणाऱ्या विविध ठेकेदारांची, कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर दाखविण्यात आलेल्या छायाचित्रावरून मृताची ओळख पटली. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना सोशल मीडियाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.तद्नंतर आरोपीच्या मोबाईलवर खून करण्यापूर्वी मृत शिवशंकरसोबत आरोपी ऋषभ याचा सेल्फी मिळून आल्यामुळे तपासाला गती मिळाली व अखेर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना ताब्यात घेतले.