शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर संभाजीनगरचा जलतरण तलाव खुला

By admin | Updated: April 9, 2017 04:33 IST

संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले

पिंपरी : संभाजीनगर येथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तलावाचे उद्घाटन झाले होते. मात्र, काहीतरी सबबी पुढे करून नागरिकांसाठी तलाव खुला करण्यास विलंब केला जात होता. उन्हाळा सुरू झाल्याने तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागल्याने उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तलाव खुला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत या घटनेचा निषेध नोंदविला. भाजपा कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. फेब्रुवारी २०१७ ला महापालिका निवडणूक असल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने २१ डिसेंबर २०१६ ला घाईघाईत तलावाचे उद्घाटन केले होते. उद्घाटनाची घाई केली; मात्र तलाव खुला करण्याच्या हालचाली होत नव्हत्या. निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता गेली. भाजपाने बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. उन्हाळा सुरू झाला असताना, बांधून तयार असलेला तलाव खुला होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, त्यामुळे भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी तलाव खुला करण्याचे पत्र प्रशासनास दिले होते. प्रशासनाने दखल घेतली जात नसल्याने भाजपाने पुढाकार घेऊन शनिवारी तलाव खुला केला. एकदा उद्घाटन झाले असताना, दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. (प्रतिनिधी)कारवाईची मागणीजलतरण तलावाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केले आहे. तलाव नागरिकांसाठी खुला करण्याची पुढील कार्यवाही महापालिका प्रशासनाची आहे. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही तलाव सुरू केला जात नाही. या दिरंगाईस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी. भाजपाची महापालिकेत सत्ता आहे. त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका मंगला कदम यांनी केली.