शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागाचा संपर्क तुटण्याची भीती

By admin | Updated: June 13, 2016 01:48 IST

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण-भोईरवाडी रस्त्यावर कुशिरे घाटात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण-भोईरवाडी रस्त्यावर कुशिरे घाटात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मागील पावसाळ्यात कोसळलेल्या दरडी व वाहून गेलेला रस्ता अद्यापही जशाचा तसाच असून, यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता बंदच होण्याच्या मार्गावर आहे. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात आहुपे-पाटण-तळेघर या आदिवासी भागाचा एकमेकांशी संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.पाटण ते भोईरवाडी हा रस्ता आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला आपापसांत जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यामुळेच आहुपे, पाटण व भीमाशंकर या तीन खोऱ्यांत विभागलेला आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग एकमेकांच्या जवळ आला आहे. पूर्वी या भागाचा दौरा करावयाचा झाल्यास भीमाशंकर खोऱ्यासाठी वेगळा दिवस, तर आहुपे खोऱ्यासाठी वेगळा दिवस द्यावा लागायचा; परंतु पाटण-भोईरवाडी रस्त्यामुळे आता संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग एकाच दिवशी फिरून होतो. या भागातील भोईरवाडी, पिंपरी, कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक, पाटण-महाळुंगे, मेघोली या आदिवासी गावांचीही दळणवळणाची होणारी गैरसोय या रस्त्यामुळे थांबली आहे. याच रस्त्यावर महाळुंगे येथे घोड नदीवर मोठा पूल टाकण्यात आला आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील हा सर्वांत मोठा पूल आहे. या रस्त्यामुळेच तालुक्याच्या आदिवासी भागाचा संपर्क करणे सहज सोपे झाले असून, या भागाला पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. माळीण दुर्घटनेच्या वेळी डिंभे-बोरघर या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाखाली आणण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला होता.भीमाशंकरमार्गे जाताना तळेघर येथून हा रस्ता फळोदे गावावरून घाट उतरून खाली पाटण खोऱ्यात पोहोचतो व तेथून कुशिरे मार्गे घाट चढून पुन्हा भोईरवाडी येथे जातो. पुढे दोन ते तीन कि.मी.नंतर हा रस्ता आहुपे रस्त्याला मिळतो. या रस्त्यामुळे आदिवासी गावांना जोडणारे अंतरही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या कालावधीत भोईरवाडी ते कुशिरे या टप्प्यावर रस्त्याची डागडुजीच झाली नसल्याने कुशिरे घाटात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. (वार्ताहर)>मागील पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळल्या असून, त्या अद्यापही रस्त्यावर तशाच पडून आहेत. घाटातून रस्ता वाहून गेला असून, काही ठिकाणी केवळ मोटारसायकल जाईल एवढाच रस्ता शिल्लक आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे हा रस्ता तुटून बाजूने खोलवर चर पडले आहेत.> आदिवासी भागातील हा महत्त्वाचा रस्ता असूनही संबंधित विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेल्यास किंवा रस्त्यावर दरडी कोसळल्यास एकमेकांशी असणारा संपर्क तुटून गैरसोय होण्याची भीती आहे.