लोणावळा : त्रिनेत्र फाउंडेशनच्या नेत्रहीन कलाकारांनी सादर केलेल्या स्वरबहार या सूर मैफल कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची शनिवारी सांगता झाली. नेत्रहिनांना सन्मान, रोजगार व स्वाभिमान देण्याच्या उद्देशाने त्रिनेत्र फाउंडेशनची वांगणी अंबरनाथ येथे स्थापना झाली. फाउंडेशनने नेत्रहिनांसाठी शब्दांचे स्वर...स्वरांचे संगीत...संगीताची दृष्टी... असे बोध वाक्य घेत स्वरबहार या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या नेत्रहिनांना दिसत नसले तरी त्यांनी ब्रेनलिपी शिकत संगीताचे ज्ञान आत्मसात केले असल्याचे फाउंडेशनच्या प्रमुख ताई पाटील यांनी सांगितले.वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभासाठी आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, विद्या निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष माधव भोंडे, वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा वसुधा पाटील, त्रिनेत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ताई पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, देविदास कडू, रवींद्र कुलकर्णी, सचिव आनंद गावडे, सुनील गायकवाड, अरविंद मेहता, राजेश मेहता, संजय गायकवाड, प्रशांत पुराणिक, चारुलता कमलवार उपस्थित होते.व्याख्यानमालेत माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांचे गुण गाईन आवडी, दुर्ग संवर्धक समिती सदस्य प्रफुल्ल माटेगावकर यांचे सह्याद्रीतील सात रत्न, कवी, लेखक प्रवीण दवणे यांचे सावर रे, यजुर्वेंद्र महाजन यांचे शिक्षण व करिअरवर बोलू काही, एमकेसीएलचे एमडी सीईओ विवेक सावंत यांचे भागीदारी मानवी व कृत्रिम बुद्धिमत्तांची, प्रा. संध्या देशपांडे यांचे बहिणाबाई या विषयावर व्याख्याने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती कमलवार यांनी केले. (वार्ताहर)
नेत्रहीनांच्या स्वरबहारने सांगता
By admin | Updated: April 24, 2017 04:43 IST