शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित, स्वच्छ प्रभागाची अपेक्षा

By admin | Updated: January 14, 2017 02:55 IST

प्रभाग क्रमांक १९ मध्ये असुरक्षितता जाणवत असल्याने नागरिक भयमुक्त आणि सुरक्षित प्रभागाची अपेक्षा करीत आहेत. पिंपरी कॅम्प

पिंपरी : प्रभाग क्रमांक १९ मध्ये असुरक्षितता जाणवत असल्याने नागरिक भयमुक्त आणि सुरक्षित प्रभागाची अपेक्षा करीत आहेत. पिंपरी कॅम्प, भाजी मंडई, भाटनगर, आनंदनगर, उद्योगनगर मिळून हा प्रभाग बनलेला आहे. प्रभागातील बऱ्याच समस्यांचे निरसन अजूनही प्रशासनाकडून झालेले नाही. खराब रस्ते किंवा पाणी समस्या या समस्या येथे आहेतच. संपूर्ण प्रभागात भेडसावणारी समस्या म्हणजे येथील असुरक्षितता ही आहे. रात्री ८ नंतर या ठिकाणी महिला, तसेच मुलींना घराबाहेर पडण्यासदेखील भीती वाटते. प्रभागात भर दिवसा गैरव्यवहार प्रकार सुरू असतात. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. रात्री काही मद्यपी दारू पिऊन नागरिकांच्या घरांसमोर शिवीगाळ करतात. नागरिकांना अडवून लूटमारीचे प्रकार सर्रास घडतात.या भागातील गुन्हेगारींचे प्रमाण वाढत चालले आहे. भांडणे, शिवीगाळ असे प्रकार सतत होताना दिसतात. या सर्व कारणांमुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी यासंदर्भात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.प्रभागात अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे. ज्याला वाटेल तो त्या ठिकाणी कचरा टाकून जातो. नागरिकांना अस्वच्छ परिसरात वावर करावा लागतआहे. काही घरासमोरच कचरा टाकला जातो. यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होतआहे. कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत असून, त्याचा विपरीत परिणाम दिसत आहे. अस्वच्छता, दुर्गंधी आणि असुरक्षिततेतून सुटका व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)