शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

By admin | Updated: July 11, 2016 00:36 IST

मोटारसायकल वरील दोन चोरट्यांनी लग्न समारंभावरून परतणाऱ्या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार व नेकलेस असा

तळेगाव दाभाडे : मोटारसायकल वरील दोन चोरट्यांनी लग्न समारंभावरून परतणाऱ्या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार व नेकलेस असा २२ तोळे सोन्याचे सुमारे साडेचार लाख रूपये किमतीचे दागिने हिसकावून घेवून पोबारा केला. ही घटना वर्दळीच्या तळेगाव स्टेशन चौकात रविवारी भरदिवसा घडली. या घटनेमुळे पोलीसांच्या कार्यक्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मंगल सूर्यकांत शेटे (वय ४७ रा. भुईज, ता. वाई, जि. सातारा) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगल शेटे या सातारा येथून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी तळेगावला आल्या होत्या. वडगाव मावळ येथून लग्नसमारंभ आटोपून त्या तळेगाव स्टेशन चौकात आल्या. तेथील एका दुकानातून नारळ घेवून त्या रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरून दोघे चोरटे आले. काही कळायच्या आत मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील १२ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, ५ तोळ्याचा राणीहार, ५ तोळ्याचे नेकलेस हिसकावले व मोटारसायकलवरून वडगाव फाट्याकडे पलायन केले. हा प्रकार आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. मंगल शेटे यांनी आरडाओरडा केला. चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले.विशेष म्हणजे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर टॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते. दोन्ही चोरटे हे २५ ते ३० वयोगटातील असून त्यांनी काळ्या रंगाचे जर्कीन व जर्किनची टोपी घातली होती. मंगळसूत्र चोरट्यांची येथील खंड पडलेली मालिका पुन्हा सुरू होवू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे. चोरट्यांचा शोध घेणे पोलीसांपुढे एक आव्हान बनले आहे. (वार्ताहर)