शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: June 2, 2016 00:29 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त बनविण्यात आले. शहरात काही भागात बीआरटीएस रस्तेही बनविण्यात आले.

रहाटणी : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त बनविण्यात आले. शहरात काही भागात बीआरटीएस रस्तेही बनविण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी या रस्त्यावर हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. अशा अतिक्रमणामुळे सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर रोजच्या अपघातात वाढ झाली आहे. सांगवी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तसेच अंडरग्राउंड रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहने संथ गतीने जातात. या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अनेक हातगाडीवाले, टेम्पोवाले विविध प्रकारचे फळ विक्री करण्यासाठी रस्त्याच्याकडेला उभे असतात. एक नव्हे, तर अनेक अनधिकृत व्यावसायिक या ठिकाणी रांगेत उभे असतात. हा माल खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला, काही वेळा रस्त्याच्या मध्यभागी सर्वच प्रकारचे वाहनचालक उभे राहत असल्याने या ठिकाणी इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत. या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडत असताना पालिकेचा संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी अपघातात काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही क क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला जाग येत नाही. शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेच्या संबंधित विभागाची आहे. मात्र हे विभागच काही प्रमाणात कुचकामी असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मागील अनेक महिन्यांपासून सांगवी फाटा येथील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र याकडे संबंधित विभाग गांभीर्याने पाहत नसल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. जर एखाद्या वेळी कारवाई करण्याचे ठरलेच, तर पथक पोहोचण्याच्या अगोदर व्यावसायिक गायब होतात. त्यामुळे या व्यावसायिकांना अभय नेमके कोणाचे हा खरा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर कारवाई करून पुन्हा या ठिकाणी हे व्यावसायिक थांबणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)