शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
3
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
4
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
5
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
7
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
8
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
9
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
10
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
11
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
12
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
13
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
14
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
15
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
16
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
17
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
18
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
19
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
20
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा

शिक्षणमंत्र्यांचे आदेश धाब्यावर

By admin | Updated: April 30, 2017 05:08 IST

नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धावाधाव सुरू आहे. मात्र, पालकांना शैक्षणिक संस्थांकडून होत असलेल्या

पिंपरी : नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धावाधाव सुरू आहे. मात्र, पालकांना शैक्षणिक संस्थांकडून होत असलेल्या भरमसाठ शुल्क आकारणीला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहरात एका कार्यक्रमात दिला. त्यानंतरही शिक्षणमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून शैक्षणिक संस्थांनी वाढीव शुल्लासाठी पालकांची अडवणूक सुरू ठेवली आहे. शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालक अगोदरपासूनच नियोजन करत असतात. यासाठी विविध शाळांमध्ये चौकशी केली जात आहे. शाळेतील विविध गोष्टींची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, पालकांना मात्र भरमसाठ शुल्क आकारणीला सामोरे जावे लागत आहे. प्रवेशासाठी गेल्यानंतर प्रवेश शुल्काची रक्कम ऐकूनच पालकांच्या छातीत धडकी भरत आहे. (प्रतिनिधी)शिक्षण अधिकाऱ्यांचे नाही नियंत्रण चांगली शाळा कोणती आहे, कोणत्या शाळेत प्रवेश मिळू शकेल, शुल्क किती असेल याबाबतची पालक चौकशी करू लागले आहेत. नामांकित शाळांत प्रवेश मिळविण्याचा काहीचा अट्टहास असतो. मात्र, तरीही प्रवेश न मिळाल्यास नेत्यांच्या घराचे उंबरे झिजवितात. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खासगी शैक्षणिक संस्थांना दोन वर्षांतून एकदा पंधरा टक्कयांपर्यंत शुल्कवाढ करण्यास मुभा दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शैक्षणिक संस्था मात्र दर वर्षी बिनबोभाट शुल्कवाढ करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शिक्षण अधिका-यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी शाळांकडे कल शासकीय शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारे अनेक जण आहेत. तेथे शुल्क कमी असते, गणवेश पुस्तके व अन्य सुविधा मिळतात. मात्र, तरीही दर्जेदार शिक्षण मिळावे या मानसिकतेपोटी शुल्क भरून खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाल्याला टाकण्यास प्राधान्य देत आहेत. शैक्षणिक शुल्क, डोनेशन, स्टेशनरी, गणवेश यांसह वर्षभरातील इतर उपक्रम या सर्वांची मोठी यादी पालकांच्या हातात दिली जात आहे. यामुळे पालक हैराण आहेत.शाळांनी नियमाप्रमाणे शुल्क घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांनी शुल्क वाढविल्या असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. नियमबाह्य शुल्कवाढ केल्यास रीतसर कारवाई केली जाईल. - बी. एस. आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ,