शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दिवाळी कोट्यवधींची

By admin | Updated: November 14, 2015 03:05 IST

वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळेच विविध वस्तूंच्या खरेदीतून गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली

पिंपरी : वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळेच विविध वस्तूंच्या खरेदीतून गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली. सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. पिंपरीसह शहरातील विविध दुकानांमध्ये वाहन, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू, सोने आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी कॅम्प येथे विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. त्यामुळे शहरासह शहरालगतच्या देहूरोड, देहू, तळेगाव, वडगाव, हिंजवडी, मारुंजी, जांबे, किवळे, मोशी या परिसरातील नागरिकही येथे खरेदीला येतात. दसऱ्यानंतर सोन्याचे भाव उतरल्याने सोने खरेदीसाठी खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतरच गर्दी वाढू लागली. दिवाळीपूर्वी २७ हजार रुपये प्रति तोळा असलेले सोने ऐन दिवाळीत २५ हजारांवर आले. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने खरेदी करण्यात आली. कपडे खरेदीसाठी अनेकांकडून पिंपरीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दिवाळी सुरू होण्याअगोदरच गेल्या आठ दिवसांपासून खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात गर्दी होती. कॅम्पात सुमारे दोनशे कपड्यांची दुकाने आहेत, तर शहरात दोन हजारांच्या वर दुकानांची संख्या आहे. कपडे खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली. आॅनलाइन शॉपिंग आणि मॉलमुळे दुकानांमधील खरेदीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. पिंपरी कॅम्पात वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था नसल्याने वाहन घेऊन येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत होती. त्यामुळे अशा ग्राहकांनी कॅम्पातील दुकानांमधून खरेदी करण्याऐवजी शहरांतील मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्यास पसंती दिली, तर आयटीतील तरुण-तरुणींनी आॅनलाइन शॉपिंग करण्यास पसंती दिली. दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गर्दी होती. अनेकांनी लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्यास प्राधान्य दिले. यासाठी महिना, दोन महिन्यांपूर्वीच वाहनांची ‘बुकिंग’ करून ठेवली होती. वाहन खरेदीत मोठी उलाढाल झाली.(प्रतिनिधी)