शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

विकासात ‘एनएसएसओ’ महत्त्वपूर्ण

By admin | Updated: June 28, 2017 04:03 IST

देशाच्या विकासासाठी पूरक व विश्वसनीय माहिती संकलनाचे कार्य गेली ७५ वर्ष एनएसएसओ जबाबदारीपूर्वक करत आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाच्या संचालिका सुप्रिया रॉय यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : देशाच्या विकासासाठी पूरक व विश्वसनीय माहिती संकलनाचे कार्य गेली ७५ वर्ष एनएसएसओ जबाबदारीपूर्वक करत आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाच्या संचालिका सुप्रिया रॉय यांनी केले.सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्यांतर्गत पुणे विभागाच्या नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. सायलवार, दिल्ली मुख्यालयाचे उपसंचालक मूलचंद भास्कर, राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी विभागाचे सहसंचालक वामन घुले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने ७५ व्या वर्षात पदार्पण करताना नवीन सर्वेक्षण कार्यक्रमाला येत्या १ जुलैपासून सुरुवात होत आहे. वर्षभर चालणाऱ्या या सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण आणि आरोग्य विषयक कौटुंबिक खर्च आणि स्वच्छ भारत अभियान याबाबत माहिती संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आकुर्डी येथील कार्यालयात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक करताना रॉय म्हणाल्या, ‘‘शासनाच्या विविध योजना आणि विकासात्म धोरणांसाठी माहिती संकलन करण्याची जबाबदारी आमच्यावर असते. योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी खात्याकडून मिळालेली माहितीही अचूक आणि सत्य असण्याची गरज असते. यासाठीच प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचे काम करणार आहेत, त्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण क्षेत्रातील गळती व त्यामागील कारणे, आरोग्य सुविधांचा आढावा अशा विविध बाबींचे संकलन करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग केंद्र शासनाच्या धोरण निश्चितीसाठी उपयोगी पडत असते.’’डॉ. सायलवार यांनी मार्गदर्शन करताना सांख्यिकीय एनएसएसओकडून संकलित करण्यात येत असलेली माहिती उपयुक्त आणि विश्वसनीय असल्याचे सांगितले. या संकलित माहितीचा उपयोग शासनाचे विविध विभाग करून घेतात. भारतीय अर्थव्यवस्थेत ही संकलित माहिती महत्त्वाची भूमिका बजावते, असे सांगितले. या वेळी मूलचंद भास्कर आणि वामन घुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले, तर एम. एस. चोरघडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी एस. जी. देवळीकर, सांख्यिकी अधिकारी महादेव कुलाळ व आनंदसागर रोटे यांनी परिश्रम घेतले.