शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा कालबद्ध विकास करणार : गिरीश बापट

By admin | Updated: February 25, 2017 02:32 IST

महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी येथे शुक्रवारी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यापार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे, एकनाथ पवार यांच्यासह भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. ‘‘उद्योगनगरीत भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी ‘एक हजारी भाग’ ही पद्धत राबविली. संघटनेच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचे कमळ फुलले आहे. यापुढे एकही दिवस वाया न घालवता विकासकामे करण्यास सुरुवात करणार आहोत. विमानतळ, मेट्रो, रेडझोन, औद्योगिक प्रदर्शन, पीएमपी बस खरेदी करणे, लोणावळा-दौंड तिसरा रेल्वे मार्ग, रस्ते रुंद करणे, विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबजावणी अशी विविध कामे नियोजनानुसार केली जातील. तीन महिन्यांतून एकदा विकासकामांचा आढावा घेतला जाईल. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास करणार आहे, असे बापट यांनी सांगितले. या वेळी लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)