शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दौंड बसस्थानक बनले अवैध धंद्यांचे आगार

By admin | Updated: May 12, 2017 04:44 IST

दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे.

मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे. रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनवला आहे. याबरोबरच इतर अवैध प्रकार स्थानक परिसरात होत असल्याने या ठिकाणी रात्रीचे येणे प्रवासी टाळतात. या प्रकारामुळे दौंडेचे स्थानक हे असुविधांचे केंद्र बनले आहे. दौंड बस स्थानक हे शहरापासून दूर आहे. यामुळे एवढ्या लांब येण्यायेवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. या स्थानकात अनेक गैरसोयी तसेच पायाभूत सुविधांची वानवा आहे. देखभाल-दुरुस्तीअभावी इमारतीला बकाल स्वरूप आले आहे. रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनविल्याने या परिसरात फिरणे प्रवासी टाळतात. बस स्थानकातील व्यापारी गाळे अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी बांधलेली सिमेंटची आसने तुटलेली आहेत. यामुळे प्रवाशांना उभे राहूनच बसगाड्यांची वाट पाहावी लागते. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात कायम दुर्गंधी असते. यामुळे या स्वच्छतागृहात न जाताच उघड्यावरच प्रवासी विधी उरकतात. सर्वाधिक गैरसोय होते ती महिला प्रवाशांची. स्थानकातील अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली आहे. भरदिवसा त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घाणीच्या साम्राज्यातच एसटी कंट्रोलरचे कार्यालय आहे. या अस्वच्छतेतच एसटी कंट्रोलरचे कामकाज चालते. स्थानकात चुकून तुरळक बसगाड्या येतात; मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या बाहेरूनच निघून जातात. तालुक्याअंतर्गत बससेवा आणि दोन ते तीन लांब पल्ल्याच्या गाड्या, की ज्या दौंड डेपोच्या आहेत, त्यांचीच वर्दळ स्थानकात असते. बस स्थानक दूर असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या नगरमोरी चौकात थांबतात. त्यामुळे प्रवाशांना गावातून नगरमोरी चौकात दोन किलोमीटर जावे लागते. परिणामी, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. काही गाड्या रेल्वे स्थानक परिसरात येतात; मात्र त्या तालुक्याअंतर्गत असतात. स्थानकाची जुनी इमारात पाडून नव्याने स्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.