शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘हायफाय’ जमान्यात सायकलचा प्रचाररथ

By admin | Updated: January 25, 2017 02:04 IST

प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात असून, आता आधुनिक काळातही पुन्हा पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला जात

पिंपरी : प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात असून, आता आधुनिक काळातही पुन्हा पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. सायकलला आणखी दोन चाके बसवीत त्यावरील लोखंडी फ्रेमवर इच्छुकांचे फलक लावून प्रचार केला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.निवडणूक म्हटले, की प्रचार आलाच. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जातात. भेटीगाठी घेण्यासह प्रचारपत्रके, जाहिरातफलक, रॅली, विविध कार्यक्रम राबविणे, भेटवस्तू देणे आदींमार्फत प्रचार केला जात आहे. यासह सोशल मीडियावरूनही प्रचाराचा धडाका सुरू आहे. या प्रचारासाठी इच्छुकांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. कमी दिवसांत मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.सध्याच्या आधुनिक काळात प्रचारही हायटेक झाला आहे. काही क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे. विरोधकापेक्षा आपण कशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. अशातच आता चिंचवडगावात सायकलच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. यासाठी विशिष्ट प्रकारची सायकल तयार करण्यात आली आहे. सायकलला दोन चाके असताना आणखी दोन छोटी चाके बसवून एक प्रकारची गाडीच तयार करण्यात आली आहे. यासाठी वेल्डिंग केले असून, फलक लावण्यासाठी मोठी लोखंडी फ्रेम तयार करण्यात आली आहे. त्यावर इच्छुकाचे चित्र लावून ही सायकल रिक्षा ठिकठिकाणी फिरविली जात आहे. महत्वाच्या ठिकाणी उभी करुन मतदानासाठी आवाहन केले जात आहे. आता पुन्हा सायकलीच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)