शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडणे जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:56 IST

पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती तसेच सद्गुरुनगर भागात पादचाºयांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत असून, या भागात शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांची चांगलीच गर्दी असते.

भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती तसेच सद्गुरुनगर भागात पादचाºयांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत असून, या भागात शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांची चांगलीच गर्दी असते. या भागात अनेकदा अपघात झाले असून, नागरिकांच्या जीवाला धोका आहे. पादचाºयांना सुरक्षितरित्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी या भागात मुख्य दोन ठिकाणी भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.भोसरीकडून चाकणकडे जाणाºया मार्गावर इंद्रायणीनगर, धावडे वस्ती, तसेच एमआयडीसीकडे जाणाºया नागरिकांना पुणे-नाशिक महामार्ग ओलांडून जावे लागते. महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असल्याने आणि एकीकडे भोसरी उड्डाणपुलावरून वेगात येणारी वाहने आणि दुसरीकडे चाकणकडून येणाºया वाहनांना रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात होतात. तसेच या भागात पादचाºयांसाठी फुटपाथही नसल्याने पायी चालणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. असाच प्रकार सद्गुरुनगर परिसरातही आहे. या भागात भुयारी मार्ग बनवावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांनी लावून धरली आहे. पण अद्यापही त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसलयाने नागरिकांच्या जिवाकडे महापालिका प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील अनेक रस्त्यांवर आणि पदपथांवर पादचाºयांना शासकीय अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. कित्येक बस थांबे थेट पदपथांवरच उभारण्यात आले आहेत. तसेच वीजवितरण कंपनीचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर यांसह महापालिकेची सेवा केंद्रे यांची अतिक्रमणे पदपथांवर झाली आहेत. ही शासकीय अतिक्रमणे असल्यामुळे ती दूर केली जात नाहीत, ही वस्तु:स्थिती आहे.वॉर्डस्तरीय निधीतून शहरात नगरसेवकांमार्फत जी कामे केली जातात त्यात नगरसेवकांनी बहुतेक ठिकाणी जे बाक दिले आहेत ते पदपथांवर चक्क आडवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पादचाºयांचे मार्गच या बाकांनी अडवले आहेत. या बाकांच्या आधारे अनेक ठिकाणी अनधिकृत टपºया व छोटी हॉटेल सुरू झाली असून, हे बाक नगरसेवकांनी दिल्यामुळे तेथे कारवाई होत नाही.