शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

बांधकाम, वाहन उद्योगांचे सीमोल्लंघन

By admin | Updated: October 11, 2016 01:35 IST

गेल्या दोन वर्षांत बांधकाम व्यावसाय, वाहन उद्योगात मंदीच्या छटा होत्या. मात्र, यंदाच्या समाधानकारक पावसामुळे ग्राहक सुखावला असून,

पिंपरी : गेल्या दोन वर्षांत बांधकाम व्यावसाय, वाहन उद्योगात मंदीच्या छटा होत्या. मात्र, यंदाच्या समाधानकारक पावसामुळे ग्राहक सुखावला असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर सदनिका, नवीन वाहन खरेदीची आगाऊ नोंदणी वाढली आहे. सोनेच्या दर कायम राहिल्याने मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड उडणार आहे. भारतीय परंपरेनुसार दसरा, दिवाळीचा मुहूर्त शुभ मानला जातो. गेल्या पाच वर्षांत प्रॉपर्टीचे भाव वेगाने वाढले. मात्र, दोन वर्षांच्या मंदीमुळे भाव स्थीर होते. अनेक बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्पात सदनिका तयार होत्या. आता मंदी ओसरून बाजारात तेजी दिसू लागली आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शहरात मध्यवर्ती भागात घर घेणे सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. महापालिका हद्दीबाहेर घर घेण्यास अधिक प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. बँक बॅलन्सनुसार वन आरके, वन बीएचके व टू बीएचके घर घेण्याची धडपड सुरू आहे. तळेगाव, आळंदी, देहू रोड, रावेत, वाकड, हिंजवडी लगतच्या नवीन प्रकल्पात आता वन रूम किचनसुद्धा उपलब्ध होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायाला दसऱ्याच्या मुहूर्तापासून चालना मिळणार आहे.उद्योगनगरीत मंदीच्या काळात अनेक छोटे व मोठे उद्योग लगतच्या भागात स्थलांतरीत झाले. मात्र, आजही टाटा, बजाज सारख्या कंपन्यांची प्रमुख कार्यालये येथे आहेत. दरवर्षी दसरा व दिवाळीच्या काळात वाहन उद्योगांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सवलती जाहीर केल्या जातात. त्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी आगाऊ नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. (प्रतिनिधी)भाव स्थिरावला : सोन्याला झळाळीगेल्या वर्षभरात सोन्याचे भाव कमी होऊन ३० हजार रुपये (१० ग्रॅम)असे स्थिरावले होते. दस-याच्या मुहूर्तावर सोनेच्या भावात विशेष वाढ न होता. सोनेचे भाव सोमवारी ३१ हजार ८५० रुपये (१० ग्रॅम) होते. दस-याला खरेदी केल्यास समृध्दी येते, या श्रध्देमुळे सोने खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे, व्यावसायिकांचे मत आहे.