शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धूळ, धुरामुळे रोखला चऱ्होलीकरांचा श्वास

By admin | Updated: January 14, 2017 02:39 IST

आळंदी-पुणे पालखी महामार्गाचे संथ गतीने चाललेले काम व याच परिसरात असलेल्या खडी क्रशर आणि सॅण्ड कंपन्यांतून अवैधपणे हवेत

भोसरी : आळंदी-पुणे पालखी महामार्गाचे संथ गतीने चाललेले काम व याच परिसरात असलेल्या खडी क्रशर आणि सॅण्ड कंपन्यांतून अवैधपणे हवेत सोडली जाणारी धूळ यामुळे चऱ्होलीकर हैराण आहेत. दिवसभर परिसरात धूळयुक्त वातावरण असल्याने परिसरातील रहिवाशांना व दररोज या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना श्वसनाच्या व आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. आळंदी, चऱ्होली भागातून भोसरी, विश्रांतवाडी व स्पाईन रोड भागात वाहनांची मोठी रहदारी असते. आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या पालखी महामार्ग रुंदीकरणाचे काम काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीने सुरु असून, मॅगझीन चौक परिसरातील काही भाग सोडला, तर दिघीपर्यंतचा सर्वच रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर धूळ हवेत पसरत असते. त्याचा दुचाकीस्वार वाहचालकांना त्रास होत आहे. वडमुखवाडीकडून स्पाईन रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर खडी व क्रशर संबंधित काम करणाऱ्या, तसेच सॅण्ड ब्लास्टिंग, पेव्हिंग ब्लॉक व स्प्रे पेंटिंगची कामे करणारे काही कारखाने आहेत. या कारखान्यांत उघड्यावरच काम चालते तसेच खडीच्या कामात निर्माण होणारी धूळ हवेत सोडली जात असल्याने या भागावर धुळीमुळे धुकेसदृश वातावरण असते. या कंपन्यांच्या बाबतीत परिसरातील रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रदूषण नियामक मंडळ व महापालिका कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.अशा धुळीमुळे श्वसनाचे, डोळ्यांचे व त्वचेचे आजार परिसरातील नागरिकांना जाणवू लागले आहेत. अवैधरीत्या धूळ हवेत सोडणाऱ्या कंपन्यांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, तसेच पालखी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच रस्त्याचे काम चालू असताना धूळ न पसरण्यासाठी संरक्षक पत्रे लावावेत. नागरिकांना रहदारीसाठी पर्यायी रस्त्याची बांधणी करावी, अशी मागणी चऱ्होलीतील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)