शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या उपद््व्यापाचे खापर फुटते ‘शिक्षण मंडळा’वर

By admin | Updated: November 10, 2015 01:45 IST

स्थायी समितीत कोण कोणाच्या मार्फत प्रस्ताव, उपसूचना पाठवते, त्याचा थांगपत्ता शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना नसतो

पिंपरी : स्थायी समितीत कोण कोणाच्या मार्फत प्रस्ताव, उपसूचना पाठवते, त्याचा थांगपत्ता शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना नसतो. इतरांच्या उपद्व्यापामुळे चुकीच्या कामाचे खापर शिक्षण मंडळावर फोडले जाते. महापालिका विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याच्या उपसूचनेमुळे शिक्षण मंडळाच्या आडून अन्य कोणी तरी फायदा उठवत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांनी नमूद केले.महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्यासाठी एक कोटीची तरतूद करावी, अशी उपसूचना ३ नोव्हेंबरच्या स्थायी समितीत मंजूर झाली. नेमका प्रस्ताव काय आहे? शिक्षण मंडळासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी शिक्षण मंडळ पदाधिकारी, सदस्य यांना विश्वासात घेतले जात नाही. केंब्रिज विद्यापीठाच्या इंग्रजी संभाषण वर्गाबद्दल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. शिक्षण मंडळाच्या कोणालाही विश्वासात न घेता, स्थायी समितीत परस्पर उद्योग केले जात आहेत. असे प्रस्ताव, उपसूचना सुरुवातीला शिक्षण मंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळाच्या शिफारशीनंतर असे प्रस्ताव, उपसूचना पुढे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेकडे पाठवले गेले पाहिजेत. इतरांच्या उपद्व्यापामुळे शिक्षण मंडळ चर्चेत येते, ही वस्तुस्थिती उघड होऊ लागली आहे. या प्रकरणी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता, पुणे महापालिकेच्या धर्तीवर काही सदस्यांनी हा महापालिका विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यासाठी एक कोटीची तरतूद करावी, अशी उपसूचना काही सदस्यांनी मांडली. ती मंजूर झाली आहे. निधीची तरतूद करावी, अशी उपसूचना होती. आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याने निधीची तरतूद करण्याची उपसूचना स्थायी समितीकडे आली. पुण्याच्या धर्तीवर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असा शैक्षणिक उपक्रम राबवायला हरकत नाही.(प्रतिनिधी)