शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बँक, एटीएम बंदमुळे गैरसोय

By admin | Updated: November 15, 2016 02:58 IST

गुरुनानक जयंतीच्या सुटीमुळे सोमवारी बँका बंद होत्या. शहरातील बहुतांश एटीएम मशिनही रक्कम नसल्याने बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना

लोणावळा : गुरुनानक जयंतीच्या सुटीमुळे सोमवारी बँका बंद होत्या. शहरातील बहुतांश एटीएम मशिनही रक्कम नसल्याने बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. सकाळपासून नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर येऊन परत जात होते. स्टेट बँकेचे एटीएमही बंद राहिल्याने नागरिकांना निराशा पत्करावी लागली. ज्यांना आज बँक बंद आहे, याची माहिती नव्हती, असे लोक बँकांच्या बाहेरदेखील येऊन उभे राहत होते. चलनातून हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय लागू झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून सर्वच बँकांच्या बाहेर नागरिकांच्या पैसे भरण्यासाठी, तसेच बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. चलनात पुरेसे सुटे पैसे नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या संकटकाळात त्यांना सहकार्य करण्याऐवजी या संधीचा काही समाजकंटक फायदा घेत आहेत. सरकारने पेट्रोल पंप, रुग्णालये, मेडिकल दुकाने, दूध विक्री केंद्र, गॅस वितरण केंद्र, रेशनिंग दुकान आदी जीवनावश्यक ठिकाणी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असताना यामधील काही मंडळी नागरिकांची लूट करत परत देण्यास सुटे पैसे नाहीत, असे कारण देत नागरिकांना हजार व पाचशे रुपयांची खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. पेट्रोल पंप व मेडिकल दुकानात या घटना सर्रास घडत आल्याने शासनाच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे.देहू बाजारपेठेत निरूत्साहदेहूगाव : येथील सर्व बॅँँका व एटीएम बंद असल्याने परिसरात बाजारपेठेत निरुत्साह दिसून आला. बॅँँकेत नोटा बदलण्यासाठी व पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. आपलेच पैसे वेळेत व हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नाराजीचा सूर ऐकू येत आहे. येथील काही एटीएम अद्यापही सुरू झाली नाहीत. एचडीएफसी व आयसीआयसी बॅँँकेचे एटीएम दोन दिवस सुरू केले होते. मात्र, तेथे पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागते व काही तासांतच एटीएममधील पैसे संपत असल्याने पुन्हा पैसे येईपर्यंत ही एटीएम देखील बंद राहतात. त्यामुळे येथील बॅँँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये मोठी गर्दी होत आहे. ज्यांना अद्याप बॅँकेकडून नोटा बदलून मिळाल्या नाहीत, त्यांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यांना हातउसनेदेखील कोणी देत नसल्याने व्यवहारात तेजी दिसून येत नाही. सुटी असल्याने व एटीएम बंद असल्याने बॅँकांपुढे शुकशुकाट होता. दोन दिवस सार्वजनिक सुटी असूनही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी नोटा बदलून देण्याचे काम १२-१२ तास सुरू होते. आज बॅँक कर्मचाऱ्यांना काहीशी विश्रांती मिळाली आहे. बॅँकेत येत असलेल्या अपुऱ्या संख्येतील नोटांमुळे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. याचा परिणाम गावातील किरकोळ विक्रेते, दुकानदार, हॉटेल व्यवसाय, मोबाइल रीचार्ज यांच्यावर झाला आहे. (वार्ताहर)