गहुंजे : गहुंजेच्या उपसरपंचपदी अमोल गोपीनाथ बोडके यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सभागृहात सरपंच शीतल किरण बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक आनंदकुमार होळकर यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य उमेश बोडके, शांताबाई बोडके , पूनम बोडके, दिनेश आगळे, कल्पना बोडके, प्रवीण बोडके, निखिल बोडके, वंदना तरस उपस्थित होते. उमेश बोडके यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. भाजपा युवा मोर्चाचे बाळासाहेब घोटकुले, रवींद्र भेगडे, संदीप काशीद, नितीन मराठे, बाळतात्या भेगडे, बाळासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते. सर्व सदस्य , ग्रामस्थांच्या वतीने अमोल बोडके यांचा सत्कार करण्यात आला. बोडके यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून, शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (वा.प्र.)
गहुंजेच्या उपसरपंचपदी अमोल बोडके बिनविरोध
By admin | Updated: October 11, 2016 01:21 IST
गहुंजेच्या उपसरपंचपदी अमोल गोपीनाथ बोडके यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सभागृहात सरपंच शीतल किरण बोडके
गहुंजेच्या उपसरपंचपदी अमोल बोडके बिनविरोध
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}