शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हौशी इच्छुक नोटाबंदीने हैराण

By admin | Updated: January 12, 2017 02:53 IST

कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणाचेही मत मिळविण्याची पात्रता नसलेलेही गल्लीबोळातील कोणातरी पक्षाची

पिंपरी : कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणाचेही मत मिळविण्याची पात्रता नसलेलेही गल्लीबोळातील कोणातरी पक्षाची उमेदवारी घेऊन हौसेखातर निवडणूक रिंगणात उतरणारे शहरात अनेकजण आहेत. निवडणुकीचे वातावरण तापताच कोणता तरी झेंडा घेऊन उमेदवार म्हणून आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे या निवडणुकीत नोटाबंदीमुळे थंडावले आहेत. बँकेतून मर्यादित रक्कम मिळते. त्या तुटपुंज्या रकमेवर शक्तिप्रदर्शनाकरिता चार कार्यकर्तेही जमा करता येत नाहीत. अन्य कोणाकडून पैसे मिळविण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात केवळ मोठ्या पक्षांच्या इच्छुकांचीच फ्लेक्सबाजी सुरू असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये ५०, १०० मते मिळविणारे कार्यकर्ते अनेक आहेत. निवडणूक हा काळ बहुतेकांच्यासाठी सुगीचा मानला जातो. हौसेखातर निवडणूक लढणाऱ्यांनाही निवडणूक काळात पैसे कमावण्याची संधी मिळते. कोणत्याच पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तरी ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेऊन अपक्ष लढण्याची हिंमतही अनेकांनी या अगोदरच्या निवडणुकीत दाखवलेली आहे. पराभव झाला, तरी एकदा नव्हे सलग दोन ते तीन वेळा अर्ज भरणारे, बोटावर मोजण्याइतपत मते मिळाली, तरी वारंवार निवडणूक रिंगणात उतरणारे शांत आहेत. पूर्वीसारखी त्यांची चुळबूळ दिसून येत नाही. त्याचे प्रमुख कारण आर्थिक चणचण आणि १० ते १५ हजार मतदारांऐवजी सुमारे ५० हजार मतदारांचा झालेला प्रभाग यामुळे अशांच्या हालचाली थंडावल्या आहेत. आपली डाळ शिजणार नाही, पैसे मिळणे तर दूरची बाब, खिशातील पैसे घालविण्याची वेळ येईल, हे लक्षात घेऊन अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे. स्वत: रिंगणात उतरण्यापेक्षा कोणाला तरी मदत करायची, त्यातूनच काही तरी हाती लागेल, अशी मानसिकता करून हौसेखातर निवडणूक लढणारे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या ताफ्यात सामील झाले आहेत. (प्रतिनिधी)अपक्षांचा पॅनल दिसणार अपवादाने अपक्ष उमेदवारांचा चार जणांचा पॅनल तयार करून ही निवडणूक लढणे अत्यंत जिकिरीचे आहे. प्रमुख राजकीय पक्षांना प्रभागात चार उमेदवारांचा शोध घेणे कठीण झाले असताना अपक्षांचा पॅनल तयार करण्याचे धाडस दाखविणारे अपवादानेच दिसून येणार आहेत. ही निवडणूक सर्वच दृष्टीने कठीण ठरणारी आहे, अशा प्रतिक्रिया इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.